ब्रेकिंग न्यूज़

सोनसडा यार्डात आजपासून मिश्र कचरा टाकण्यास मनाई

सोनसडा येथील यार्डात कचरा प्रक्रिया प्रकल्पात आज सोमवारपासून मिश्र स्वरूपाचा कचरा स्वीकारला जाणार नाही. वर्गीकरण केलेला कचरा टाकावा अशी मागणी फोमेंतो ग्रीन कंपनीने करताच पालिका जागी झाली व आजपासून वर्गीकृत कचरा उचलण्याची ताकीद लोकांना दिली. बर्‍याच प्रमाणात लोकांनी वर्गीकृत कचरा दिला.
ओला कचरा व सुका कचरा वेगळा करून देण्याची जाहीर सूचना पालिकेने केली होती. ओला कचरा दररोज घरोनघर गोळा केला जाईल व सुका कचरा आठवड्यातून दोनदा उचलण्याचे पालिकेने ठरविले आहे. कुडतरी, मायणा, राय येथील लोकांनी व स्थानिक लोकांनी वर्गीकृत कचरा टाकण्याचा इशारा दिला होता. न पेक्षा ट्रक अडविण्याचीही धमकी दिली होती.

फोमेंतोने कोणताच वेळ न देता आजपासून ओला कचरा टाकण्याचे सांगताच नगराध्यक्षा बबिता प्रभुदेसाई यांनी चिंता व्यक्त केली. त्यांनी दिलेली मुदत अगदीच कमी आहे. ही बाब उच्चाधिकार समितीमध्ये मांडण्याचे आश्‍वासन दिले.