सेरेना उपांत्य फेरीत

रोमानियाची सातवी मानांकित सिमोना हालेप, अमेरिकेची ११वी मानांकित सेरेना विल्यमसह बार्बारा स्ट्रायकोवा व इलिना स्वितोलिना यांनी उपउपांत्य फेरीत आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत अंतिम चारमध्ये स्थान मिळविले आहे. सेरेनाने आपल्याच देशाच्या ऍलिसन रिस्के हिचा ६-४, ४-६, ६-३ असा पराभव केला. बिगरमानांकित स्ट्रायकोवाने १९व्या मानांकित योहाना कोंटा हिला ७-६, ६-१ असे पराजित केले. हालेपने चीनच्या शुआई झांगचे आव्हान ७-६, ६-१ असे परतवून लावले तर स्वितोलिनाने कॅरोलिना मुचोवाला ७-५, ६-४ असे हरविले. विल्यम्स-स्ट्रायकोवा व स्वितोलिना-हालेप असे उपांत्य सामने रंगणार आहेत.