सेरूला कोमुनिदाद उपसमितीच्या फेरनिवडणुकीचा आदेश

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सेरूला कोमुनिदाद उपसमितीची निवडणूक नव्याने घेण्याचा आदेश कोमुनिदाद प्रशासकांना काल दिला.

सेरूला कोमुनिदादच्या ३ मार्च २०१९ रोजी निवडणूक घेण्यात उपसमितीच्या निवडणुकीला प्रशासकीय लवादासमोर आव्हान देण्यात आले होते. या निवडणुकीसाठी ३७५ जणांनी नोंदणी केली होती. उपसमितीची निवड करण्यासाठी हात उंचावून मतदान घेण्यात आले होते. मतमोजणीच्या वेळी मतांची संख्या जास्त आढळून आली. प्रशासकीय लवादाने सदर निवडणूक रद्द ठरविली होती.