ब्रेकिंग न्यूज़

सेंट क्रुझ केळशीला गोवा पोलिसांनी रोखल

>> जीनो-जीएफए प्रथम विभाग लीग

गोवा पोलिस संघाने सेंट क्रुझ केळशीला गोलशून्य बरोबरीत रोखत जीनो-जीएफए प्रथम विभाग लीग स्पर्धेत राय मैदानावरील लढतीत गुण विभागून घेतले.
बरोबरीमुळे केळशीने गणतालिकेत अव्वलस्थानी पोहोचण्याची संधी गमावली. १० सामन्यांतून त्यांचे २२ गुण झाले आहेत. तर गोवा पोलिस संघ ९ सामन्यांतून ९ गुणांवर आहे.

दोन्ही संघांनी पूर्ण गुणांसाठी जोरदार प्रयत्न केले होते. परंतु त्यांना संपूर्ण सामन्यात एकामेकांच्या गोलरक्षकाला भेदण्यात अपयश आले. संपूर्ण लढतीत शानदार कामगिरी केलेला गोवा पोलिस संघाचा गोलरक्षक निकेश नाईकची सामनावीर पुरस्कारसाठी निवड झाली.