सूरतेतील इमारतीस भीषण आग ः १७ विद्यार्थी मृत्यूमुखी
Indian firefighters try to control a major fire in a building housing a college, in Surat, some 270 kms. from Ahmedabad on May 24, 2019. - At least 15 students died on May 24 in a fire in a building in India housing a college, officials said, with images showing people jumping to escape the blaze. "The students lost their life both because of the fire and jumping out of the building," Deepak Sapthaley, a fire official in the western city of Surat, told AFP. (Photo by STR / AFP)

सूरतेतील इमारतीस भीषण आग ः १७ विद्यार्थी मृत्यूमुखी

>> तिसर्‍या मजल्यावरून उड्या घेतल्याने मृत्यू

येथील एका इमारतीला काल दुपारी भीषण आग लागल्याने त्यातील कोचिंग क्लासेसचे १७ विद्यार्थी मृत्यूमुखी पडले. आग लागल्यानंतर तेथे धुरात गुदमरल्याने या विद्यार्थ्यांनी तिसर्‍या मजल्यावरून खाली उड्या घेतल्या. त्यात ते मृत्यूमुखी पडले. या भीषण दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून याप्रकरणाशी पीडितांना सर्व ती मदत द्यावी असे त्यांनी गुजरात सरकारला सुचविले आहे.
या भीषण दुर्घटनेमुळे आपण अत्यंत व्यथित झालो असून मृतांच्या कुटुंबियांप्रती आपण सहवेदना व्यक्त करीत आहे असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो असेही त्यांनी म्हटले आहे.

सूरतमधील तक्षशीला कॉम्प्लेक्स या इमारतीच्या तिसर्‍या व चौथ्या मजल्यावर ही आग लागली होती. या आगीमुळे दोन्ही मजल्यांवर प्रचंड धूर निर्माण झाल्याने येथील विद्यार्थी गुदमरले. त्यातून वाचण्यासाठी त्यांनी तिसर्‍या मजल्यावरून उड्या घेतल्याचे दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या चित्रणात दिसून आले. दुर्घटना घडली त्यावेळी कोचिंग क्लासेसच्या वर्गांमध्ये ५० विद्यार्थ्यांसह काही शिक्षकही होते. त्यापैकी २० विद्यार्थ्यांनी वरून उड्या घेतल्या. इमारतीतून २० विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.