ब्रेकिंग न्यूज़

सूज

– भरत म. नाईक

काही वेळेस सूज शरीराच्या दोन्ही शाखांमध्ये एकाच वेळेस सारखीच जाळत असते. तसेच दुसर्‍या प्रकारात सूज शरीराच्या कोणत्याही एकाच भागात येते. त्याला ‘एकदेशोत्थित शोध’ म्हणतात. व्यवहारात आम्हाला सहा प्रकारच्या सुजेचा सामना करावा लागतो. वात, पित्त, कफ, हृद, वृक्क (किडनी) व आगंतूक कारणाने येणारी सूज.

सूज
शारीरिक दोष व आगंतुक कारण, पुन्हा शोध आणखी शोध दोन प्रकारे वर्ग करता येतो. काही वेळेस सूज शरीराच्या दोन्ही शाखांमध्ये एकाच वेळेस सारखीच जाळत असते. तसेच दुसर्‍या प्रकारात सूज शरीराच्या कोणत्याही एकाच भागात येते. त्याला ‘एकदेशोत्थित शोध’ म्हणतात. ती सूज व्रण होण्याचे पूर्वरूप असते. व्यवहारात आम्हाला सहा प्रकारच्या सुजेचा सामना करावा लागतो. वात, पित्त, कफ, हृद, वृक्क (किडनी) व आगंतूक कारणाने येणारी सूज.
ऍलर्जी, आमवात, उदर, कफविकार, कावीळ, गरमी, परमा, गंडमाळा, टॉन्सिल, त्वचाविकार, दुबळेपणा, नागीण, पांडू, पित्तविकार, ब्लडप्रेशर, मधुमेह, महारोग, लठ्ठपणा, वातविकार, संधिवात, सोरायसीस, हृदयरोग व क्षय या विकारांतील सूज या लक्षणांचा विचार त्या-त्या स्वतंत्र पुस्तकात केलेला आहे.
कारणे ः
१. शरीरातील रक्त, पित्त व कफ बिघडण्याची कारणे घडणे, आहार-विहार, पथ्यपाणी, वागणे-बोलणे, चालणे, विचार, मनाने कार्य यात कमी-अधिकपणा असणे.
२. त्यामुळे शरीरातील सर्वसंचारी वायूची गती रुद्ध होते, त्याच्या कार्यात निक्षेप येतो, तो शरीरातील शिरा, स्नायू यांची तोंडे, कफ, पित्त यांनी बंद करतो व सूज येते.
३. घाव, अपघात, विषारी प्राण्यांचे चावे अशी आगंतुक कारणे घडणे.
४. उदरविकार.
५. शरीरातील कारणांनी, आगंतुक कारणाने रक्त कमी होणे.
लक्षणे ः
१. शरीराच्या कोणत्याही एका भागात सूज येणे.
२. शरीराच्या दोन्ही भागांना सारखीच सूज येणे-जाणे.
३. सर्व शरीरावर प्रथम पाय, नंतर पोट, नंतर सर्वांग अशी सर्वांगाला सूज येणे.
४. रक्त कमी होणे.
५. मुंग्या येणे, बधीरपणा वाटणे.
शरीर परीक्षण ः
सूज पोकळ आहे का दडस आहे? खड्डा पडतो का? सुजेच्या ठिकाणी स्पर्श थंड का उष्ण? सूज सांध्यावर आहे का सांधे सोडून आहे? सूज कोणत्या भागात येते-जाते, विश्रांतीने सूज कमी होते? सुजेचे रूपांतर व्रणात होईल का? रक्त कमी आहे का? यकृतप्लाहीवक्व यांची सूज, जीभ, लघवीचे प्रमाण तथा वर्णपीडा या सर्वांची माहिती घ्यावी. सूज शरीराच्या का भागात की शरीराच्या दोन्ही भागांत सारख्याच स्वरुपाची आहे का ते पहावे.

अनुभविक उपचार ः
१. वातज शोध ः
ात मलावरोध व मलप्रवृत्ती चिकट असल्यास एरंडतेल किंवा एरंड हरितकी एक चमचा रात्रौ गरम पाण्याबरोबर घ्यावे. नारायण तेलाने मालिश करावे. गरम पाण्यात मीठ टाकून सुजेचा भाग शेकावा. सिंहनादलक्षादी, गुग्गुळ व आरोग्यवर्धिनी प्रत्येकी तीन-तीन गोळ्या दोन्ही जेवणानंतर बारीक करून घ्याव्यात. सुजेच्या जागी दशांगलेप लावावा व रात्रभर ठेवावा.
२. पित्तज शोध ः
आग, दाह, चुणचुण, लाली असल्यास चंदन गार पाण्यात उगाळून लेप लावावा. सुकला की नवीन लावावा. या पद्धतीने दशांग लेप लावावा. प्रवाळ कामदुधा व चंदनचदीवटी ३/३ गोळ्या सकाळ-संध्याकाळ पाण्याबरोबर घ्यावात. रात्रौ त्रिफळा चूर्ण एक चमचा गरम पाण्याबरोबर घ्यावे.
३. कफज शोध ः
सकाळी सूज येत असल्यास व वाढत असल्यास कफनाशक म्हणून आरोग्यवर्धिनी, चंद्रप्रभा व त्रिफळा गुगुळ प्रत्येकी तीन गोळ्या बारीक करून दोन्ही जेवणानंतर घ्याव्यात. सर्दी, पडसा, खोकला ही लक्षणे अधिक असल्यास लक्ष्मीनारायण, ज्वरांकुश प्रत्येकी तीन गोळ्या दोन वेळा अधिक औषध म्हणून पिंपळ चूर्ण चिमुटीएवढे मधातून चाटण करावे. अळणी जेवावे.
४. हृदयासंबंधी शोध ः
विश्रांतीनंतर सूज कमी होत असल्यास व जास्त प्रमाणे सूज येत असल्यास विश्रांती घ्यावी. सुवर्णमाक्षिकादीवटी, चंद्रप्रभा शृंगभस्म प्रत्येकी तीन गोळ्या दोन वेळा घ्याव्यात. रसायन चूर्ण सकाळी व सायंकाळी एक चमचा घ्यावा.
५. मूत्र किंवा वृक्कसंबंधी शोध ः
मूत्रात पिष्टमय पदार्थ जास्त असल्यास, मूत्राला घाण वास मारत असल्यास, सुजेचा खड्डा पडत असल्यास गोक्षुरादी गुगुळ सहा गोळ्या, अरोग्यवर्धिनी व चंद्रप्रभा प्रत्येकी तीन गोळ्या दोन वेळा बारीक करून घ्याव्यात. रसायनचूर्ण सकाळी व सायंकाळी एक चमचा घ्यावे. पुनर्नवा व गोक्षुर यांच्या प्रत्येकी १० ग्रॅम भरडीचा काढा सायंकाळी घ्यावा व धनेपुड सकाळी एक चमचा घ्यावी.
६. आगंतू कारणाने शोध ः
कारणांचा विचार करून उपचार करावेत. किटक, कोळी, पाल यांच्या विकारात दशांश लेपाचा किंवा चंदनाचा गार पाण्यातील पातळ लेप पुन्हा पुन्हा लावावा.
७. पांडुतेमुळे शोध ः
लहान व वृद्धांना पांडुता हे अधिक लक्षण दीर्घकाळ टिकून असल्यास पुनर्नवा मंडूर, आरोग्यवर्धिनी व चंद्रप्रभा प्रत्येकी एक तीन गोळ्यांपर्यंत दोन वेळा घ्याव्यात. तरुणांना पांडू हे प्रमुख कारण सुजेत असल्यास चंद्रप्रभावटी, मधुमेहवटी आरोग्यवर्धिनी व सुवर्णमाक्षिकावटी प्रत्येकी तीन गोळ्या बारीक करून घ्याव्यात. स्त्रियांना पांडू, शोभ, धुपणीच्या तक्रारी असल्यास वरीलप्रमाणे औषधे घ्यावीत.
पथ्यापथ्य ः
१. वातप्रधान सुजेवर वातुळ पदार्थ, शेव, भजी, चिवडा, वडे, कडधान्याचा अतिरेक, पोहे, चुरमुरे, डालडा, गरम पदार्थ, जड पदार्थ खाऊ नयेत. जेवण गरम गरम घ्यावे.
२. पित्तप्रधान सुज असल्यास तिखट, खारट, आंबट पदार्थ वर्ज्य करावेत. गाईचे दूध, मूग, कोथिंबीर, धने, ज्वारीची भाकरी, कोहळा, नारळाचे पाणी, चवळई, दुध्या भोपळा, कारले, पडवळ, दोडक्या यांचा आहारात उपयोग करावा.
३. कफप्रजान सूज असल्यास जड आहार, मीठ, आंबट पदार्थ, दही, लोणचे, पापड, मांसाहार, मेवामिठाई, थंड पाणी कटाक्षाने टाळावे.
४. हृदयरोगजन्य सूज असल्यास पूर्ण विश्रांती व सौम्य आहार असावा.
५. रक्त कमी असल्यास जेवण व्यवस्थित घ्यावे. आहार भरपूर घ्यावा. करिता अले, आमसुल, चिरे यांची चटणी वापरावी.
६. लघवी कमी होण्यामुळे सूज असल्यास नारळाचे, धण्याचे पाणी घ्यावे. भरपूर पाणी प्यावे.