सुवर्ण जयंती योजनेखालील अपूर्ण प्रकल्पांना निधी देणार

>> नगरविकासमंत्री मिलिंद नाईक यांची माहिती

राज्यात सुवर्ण जयंती योजनेखाली अपूर्णावस्थेत असलेले प्रकल्पांना १४ व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून निधी उपलब्ध केला जाणार आहे, अशी माहिती नगरविकास मंत्री मिलिंद नाईक यांनी विधानसभेत नगरपालिका प्रशासन, समाज कल्याण या खात्याच्या अनुदानित पुरवणी मागण्यावरील चर्चेला उत्तर देताना काल दिली.

वर्ष २०११ मध्ये सुवर्ण जंयती योजनेखाली कला व संस्कृती खात्यातर्ङ्गे नगरपालिकांना विशेष प्रकल्प उभारणीसाठी खास अनुदान देण्यात आले होते. काही मोजक्या पालिकांना या सुवर्ण निधीचा विनियोग केला आहे. काही पालिकांनी घेतलेले प्रकल्प अपूर्णावस्थेत आहेत. त्या पालिकांनी निधीसाठी नगरपालिका प्रशासनाकडे विनंती केलेली आहे. अपूर्णावस्थेतील प्रकल्प १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून मार्गी लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असेही मंत्री नाईक यांनी सांगितले. राज्यातील नगरपालिका क्षेत्रात सोपो कंत्राटदारांच्या मनमानी कारभाराला आळा घातला जाणार आहे. काही नगरपालिकातील सोपो कंत्राटदारांचा मनमानी कारभार सुरू आहे.

मार्केटमधील जागे विक्रेत्यांना देताना स्थानिकांवर अन्याय केला जात आहे, असे मंत्री नाईक यांनी सांगितले. पणजी, म्हापसा, वास्को आणि मडगाव या पालिकांना कचरा समस्या भेडसावत आहे. त्यासाठी कचरा व्यवस्थापन खात्याशी योग्य समन्वय साधून योजना राबविली जाणार असल्याचे मंत्री नाईक यांनी सांगितले.