सुप्रिम कोर्टाच्या वकिलांचाही सीएए, एनआरसीला विरोध

>> जंतर मंतरपयर्र्ंत काढला निर्षेध मोर्चा

सीएएविरोधात देशभरात विविध विरोधी राजकीय पक्ष, विविध सामाजिक संघटना, ज्ञाती संघटना यांच्याकडून निषेध मोर्चे, आंदोलने केली जात असतानाच आता या कायद्याविरोधात सर्वोच्च न्यायालयाचे वकीलही रस्त्यावर आले आहेत. काल या वकिलांनी सर्वोच्च न्यायालय ते जंतरमंतर या मार्गावर निषेध मोर्चा काढला. सीएए, एनआरसी तसेच एनपी आर (नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर) या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांनी हा मोर्चा काढला. या विषयांना विरोध करणार्‍या विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांकडून केल्या जाणार्‍या दडपशाहीचा तसेच भारतीय राज घटनेवर केल्या जाणार्‍या हल्ल्याविरोधात हा मोर्चा असल्याचे या वकिलांनी म्हटले आहे.
दरम्यान दोन दिवसांपूर्वी सीएए कायद्याची देशभरात अंमलबजावणी सुरु झाली आहे. असे असले तरी या कायद्याला होणार्‍या विरोधात खंड पडलेला नाही.