‘सीबीएसई’चा अभ्यासक्रम ३० टक्क्यांनी कमी होणार

कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय माध्यमिक शिक्षा (सीबीएसई) बोर्डाने २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी नववी ते १२ वी इयत्तेचा अभ्यासक्रम ३० टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. देशात पर्यायाने जगात कोरोनाचा फैलाव जोरदार सुरू असून सीबीएसईला नववी ते १२ इयत्तेपर्यंतचा अभ्यासक्रम कमी करण्याचा सल्ला दिला होता, असे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरीयाल यांनी सांगितले. अभ्यासक्रम कमी करण्यासंदर्भात देशभरातील शिक्षण तज्ज्ञांकडून १५०० सल्ले मिळाल्याचे पोखरीयाल यांनी सांगितले.