सीएए विरोधात मुस्लिमांची वास्कोत रॅली

सीएए विरोधात मुस्लिमांची वास्कोत रॅली

केंद्र सरकारच्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या (सीएए) विरोधात वास्कोत मुस्लिम बांधवानी काल भव्य रॅली काढून प्रखर विरोध दर्शविला. संसदेत हे विधेयक मंजुर झाल्यापासून वास्कोतही या कायद्याविरोधात तीव्र पडसाद उमटले आहेत. मुस्लिम बांधवानी केंद्र सरकारच्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या (सीएए) विरोधात आजपर्यंत तीन वेळा निदर्शने करून प्रखर विरोध दर्शविला. काल शेकडो मुस्लिम बांधवानी येथील मुरगाव नगरपालिकेकडून एफएल गोम्स मार्गे रॅली काढून सीएए विरुध्द घोषणाबाजी केली. रॅली एफएल मार्गे सरळ टिळक मैदानाकडे जाऊन परत त्याच मार्गाने मुरगाव पालिकेकडे आल्यानंतर याचे सभेत रुपांतर होऊन शेवटी राष्ट्रगीताने सांगता करण्यात आली.