सामुदायिक दूध उत्पादन योजनेची अधिसूचना जारी

राज्यातील दूध उत्पादनात वाढ करण्याच्या उद्देशाने कॉम्य्ुनिटी डेअरी योजना अधिसूचित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत कमीत कमी ५ जणांचा गट दुधाचा व्यवसाय सुरू करू शकतो. या योजनेच्या माध्यमातून युवक स्वयंरोजगार सुरू करू शकतात.

या नवीन योजनेखाली ५० दुभती जनावरांची खरेदी केली जाऊ शकते. दूध व्यवसायाला उद्योगाचा दर्जा देण्यासाठी ही योजना तयार करण्यात आली आहे. या योजनेखाली एक कोटी रुपयांपर्यंत अनुदान उपलब्ध केले जाऊ शकते. दुभती जनावरांच्या खरेदीबरोबरच गोठा, दूध साठवून ठेवण्यासाठी आवश्यक उपकरणे व इतरांची खरेदी केली जाऊ शकते. जनावरे खरेदीसाठी मार्गदर्शक सूचना तयार करण्यात आलेल्या आहेत. या योजनेअर्तंगत खरेदी दुभत्या जनावरांचा विमा, हिरवा चारा आदींचा समावेश आहे. सरकार दरबारी नोंदणीकृत गट या योजनेचा लाभ घेऊ शकतो. या गटाकडे हिरवा चारा तयार करण्यासाठी ५ एकर जागा असली पाहिजे. फक्त नवीन व्यवसायासाठी ही योजना लागू होणार आहे.