सांताक्रुझ टोळीयुद्धातील संशयितांकडून शस्त्रे जप्त

 

ओल्ड गोवा पोलिसांनी सांताक्रुझ येथील टोळीय्ुध्द आणि सोनू यादव या युवकाच्या मृत्युप्रकरणी आणखी चार जणांना अटक करण्यात आली असून संशयितांकडून २ रिव्हॉल्वर, १ पिस्तूल, ४ तलवारी आणि २ चॉपर जप्त केले आहेत.

सांताक्रुझ टोळी य्ुध्द प्रकरणात सोनू यादव याच्यावर कुणी गोळी झाडली याबाबत अजून माहिती उजेडात आलेली नाही. पोलिसांकडून या प्रकरणी संशयित गुंडाची धरपकड सुरू आहे. सुरज शेटये, विशाल गोलतकर, अदिल मकंदर, जावेद बेल्लारी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. शनिवारी या प्रकरणी तिघांना ६ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
पोलीस महानिरीक्षकांनी या टोळीयुद्धाची गंभीर दखल घेतली असून पणजी परिसरातील गुंडगिरीचा नायनाट करण्यासाठी प्रसंगी राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली गुंडाच्या विरोधात कारवाई करण्याची सूचना संबंधितांना केली आहे.

शनिवारी पहाटे सांताक्रुझ येथे टोळी युद्धात गोळी लागून एकाचा बळी गेल्याने खळबळ उडाली होती. ओल्ड गोवा पोलिसांनी याप्रकरणी आत्तापर्यंत दहा जणांना अटक केली आहे.