ब्रेकिंग न्यूज़

सांतइनेज स्मशान भूमीत ‘त्या’ मृतदेहांवर अंत्यसंस्कार

नागेशी येथे बुधवारी संध्याकाळी तळीत बुडून मृत्यू झालेल्या तिन्ही मुलांच्या मृतदेहांवर काल दुपारी सांतइनेज स्मशान भूमीत शोकाकूल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले. मृत झालेल्या मुलांचे वडील काल सकाळी गोव्यात पोहचल्यानंतर गोमेकॉत उत्तरीय तपासणी करण्यात आली. नागेश देवस्थानाच्या समोरील तळीत बुडून तीन मुलांचा बुधवारी दुर्दैवी मृत्यू झाला होता. अदिती भट (१२), भुवनेश्वर भट (८) व श्रावण होला (७) यांचा मृतांत समावेश होता. वेंकटेश भट व बाळकृष्ण होला या मुलांचे वडील काल सकाळी गोव्यात पोहचले. त्यानंतर गोमेकॉत तिन्ही मृतदेहांवर उत्तरीय तपासणी करण्यात आली.
तिन्ही मृतदेह मंगळूर येथील घरी न नेता मृतदेहांवर गोव्यातच अंतिम संस्कार करण्याचा निर्णय पालकांनी घेतला. सांतइनेज येथील स्मशानभूमीत तिन्ही मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यात आले.