ब्रेकिंग न्यूज़

सरदेसाईंच्या ‘त्या’ वक्तव्याशी माविन गुदिन्हो असहमत

उपमुख्यमंत्री तथा गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांच्या गोंयकाराच्या हितरक्षणासाठी प्रसंगी युवकांच्या हाती शस्त्रे देण्याच्या वक्तव्याशी आपण असहमत असल्याचे पंचायत मंत्री मावीन गुदिन्हो यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.
सरकारमध्ये महत्त्वाच्या पदावर काम करणार्‍या नेत्यांनी कुठल्याही प्रकारचे वक्तव्य करताना भान ठेवण्याची गरज आहे. उपमुख्यमंत्री सरदेसाई यांचे वैयक्तिक मत असावे. राज्यातील निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या विषयावर सविस्तर चर्चा केली जाईल, असेही मंत्री गुदिन्हो यांनी सांगितले.