सरकारची वाटचाल प्रकाशातून अंधाराकडे ः ढवळीकर

>> अभिभाषणावरील आभाराच्या चर्चेत विरोधकांची टीका

विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभारप्रदर्शक ठरावावरील दुसर्‍या दिवशीच्या चर्चेच्या वेळी विरोधी पक्षांच्या आमदारांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. सरकारची वाटचाल प्रकाशाकडून अंधाराकडे सुरू आहे, अशी टीका मगोपचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी केली. तर, सरकारकडे कुठलेही धोरण नसल्याने दिशाहीन कारभार सुरू असल्याची टीका गोवा ङ्गॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी केली.
कर्नाटकने म्हादईचे २७ टक्के पाणी वळविले आहे. म्हादईच्या पाण्याचा प्रवाह कमी झाला आहे. म्हादईच्या रक्षणासाठी जनजागृती अभियान सुरू करावे लागले आहे, असे आमदार ढवळीकर यांनी सांगितले.
राज्यातील जुगार बंदीची सुरूवात विधानसभेसारख्या पवित्र सभागृहातून झाली पाहिजे. कॅसिनोत जुगार खेळण्यासाठी जाणारे मंत्री, आमदार यांनी प्रथम कॅसिनोत जाणे बंद करावे. त्यानंतर सरपंच, जिल्हा पंचायत सदस्य, पंच सदस्य त्यात सहभागी होतील, असेही ढवळीकर यांनी सांगितले.

राज्यातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांची बिले प्रलंबित आहे. सरकार गळीत हंगाम सुरू करू शकले नाही. आता, १०० कोटींचा नवीन कारखाना उभारण्याचे आश्‍वासन दिले जात आहे. सरकारने स्वच्छतागृहे नागरिकांना उपलब्ध न करता ओडीएङ्ग जाहीर केले आहे. राज्यातील स्थानिक दुधाच्या उत्पादनातील वाढ समाधानकारक नाही. सरकार आर्थिक संकटाला तोंड देत असताना वित्त खात्याचा विरोध असताना रस्ता करात ५० टक्के कपात करून ५२ कोटी रूपयांचा महसूल बुडविण्यात आला आहे. नवीन मोटर वाहन कायद्याची वर्ष उलटले तरी अंमलबजावणी केली जात नाही, असेही ढवळीकर यांनी सांगितले.

अर्थव्यवस्थेची घसरण ः सरदेसाई
सरकारकडे दृष्टीकोन नाही आणि पैसेही नाहीत. सेझ जमीन व्यवहारामध्ये पारदर्शकतेचा अभाव दिसून येत आहे. अर्थव्यवस्थेची घसरण झाली आहे. केंद्र सरकारकडून काहीच आर्थिक सहाय्य मिळू शकले नाही. राज्य सरकारकडून केवळ नोकरभरतीचे आमिष दाखविले जात आहे, अशी टीका आमदार सरदेसाई यांनी केली.

अमलीपदार्थाचा सुळसुळाट ः पालयेकर
आमदार विनोद पालयेकर यांनी अमलीपदार्थाबाबत अनेक तक्रारी केल्या आहेत. परंतु, एकाही तक्रारीची दखल घेण्यात आली नाही. अमलीपदार्थाचा सुळसुळाट झाला आहे. राज्याचा अर्थसंकल्प तयार करण्यासाठी लोकांच्या सूचना ऑनलाईन पध्दतीने स्वीकारण्यात आल्या. परंतु, आमदारांकडून सूचना घेण्यात आल्या नाहीत, अशी टीका सरदेसाई यांनी केली.

युवकांची दिशाभूल ः खेवटे
राज्य सरकारकडून आर्थिक स्थितीबाबत योग्य माहिती दिली जात नाही. म्हादई, अमलीपदार्थ, कायदा व सुव्यवस्था सारख्या प्रश्‍नाकडील नागरिकांचे लक्ष इतरत्र विळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्यात नवीन उद्योग येत नाहीत. नोकर्‍याबाबत युवकांची दिशाभूल केली जात आहे, अशी टीका आमदार रोहन खंवटे यांनी केली.

खाणप्रश्‍नी केवळ आश्‍वासन ः रवी
राज्यातील खाण व्यवसाय पुन्हा सुरू करण्याचे केवळ आश्‍वासन दिले जात आहे. गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने मान्यता दिलेल्या प्रकल्प केवळ कागदावरच आहेत. पशुसंवर्धन खात्याकडून दूध उत्पादन वाढीसाठी कोट्यवाधी ़खर्च केला जात आहे. दूध उत्पादनातील वाढ समाधानकारक नाही, अशी टीका आमदार रवी नाईक यांनी केली.

म्हादईसाठी दबाव गट ः फालेरो
नावेली येथील वेस्टन बगल रस्त्यातील तीन घरमालकांचे पुर्नवसन करण्याच्या आश्‍वासनाची तीन वर्षे उलटली तरी पूर्तता करण्यात आली नाही. मुख्यमंत्री, मंत्री पुनर्वसनाचे आश्‍वासन देत आहेत. परंतु, अधिकारी वर्गाकडून योग्य सहकार्य मिळत नाही. म्हादईच्या प्रश्‍नाकडे लक्ष वेधण्यासाठी दबावगट निर्माण करण्याची गरज आहे, असे आमदार लुईझीन ङ्गालेरो यांनी सांगितले.

डिसेंबर महिन्यात आयोजित सनबर्न संगीत महोत्सवात तिघांचा संशयास्पद मृत्यू झाला. परंतु, त्यांच्या मृत्यूचे कारण अद्यापपर्यत स्पष्ट झालेले नाही, असे आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी सांगितले. राज्यात कॅन्सरचे प्रमाण वाढत चालले आहे. अन्न व औषध प्रशासनाने अन्न पदार्थाची तपासणी योग्य पध्दतीने करण्याची गरज आहे. दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ सुरू करण्यासाठी केवळ तारखांवर तारखा दिल्या जात आहेत. म्हादई अभयारण्यातील ४ वाघांच्या मृत्यूचे प्रकरण चिंताजनक आहे. अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये म्हणून उपाययोजना करण्याची गरज आहे, असे रेजिनाल्ड यांनी सांगितले.

राज्यातील शेतकर्‍यांना आधारभूत किंमत वेळेवर मिळत नसल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. जलसिंचन व शेती खात्याने संयुक्तपणे शेतीच्या विकासासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. सांगे तालुक्यातून गोव्यातील इतर भागात पाण्याचा पुरवठा केला जातो. परंतु, सांगे तालुक्यातील लोकांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे, असे आमदार प्रसाद गावकर यांनी सांगितले.
भाजपचे आमदार नीळकंठ हर्ळणकर,