सरकारकडून प्रशासकीय पातळीवर खातेबदल

>> १५ आयएएस अधिकार्‍यांच्या खाते बदलाचे आदेश केले जारी

सरकारने आयएएस अधिकार्‍यांच्या सचिव पातळीवर कामकाजाचे नव्याने वाटप करून प्रशासकीय पातळीवर खातेबदल केले. काही सचिव, विशेष सचिवांच्या खात्यात बदल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रविवारी आयएएस अधिकार्‍यांची बैठक घेतल्यानंतर मंगळवारी आयएएस अधिकार्‍यांच्या खात्यांत बदलाचा आदेश जारी करण्यात आला.

मुख्य सचिव परिमल राय यांच्याकडे दक्षता, गृह, कार्मिक, एआरडी आणि बांधकाम ही खाती देण्यात आली आहेत. प्रधान सचिव पुनित कुमार यांच्याकडे वीज, वन, पर्यावरण, विज्ञान व तंत्रज्ञान, अपारंपरिक ऊर्जा ही खाती देण्यात आली आहेत.
प्रधान सचिव पी. कृष्णमूर्ती यांची मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आणि नवी दिल्ली येथे प्रधान निवासी आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. डब्लू.व्ही. आर. मूर्ती यांच्याकडे सहकार, समाज कल्याण, शिष्टाचार, सर्वसाधारण प्रशासन, नागरी वाहतूक, नगरविकास ही खाती देण्यात आली आहेत.

दौलत हवालदार यांच्याकडे वित्त, खाण, मच्छीमारी, नियोजन व सांख्यिंकी, कृषी आणि नगर नियोजन ही खाते देण्यात आली आहेत. पी. एस. रेड्डी यांच्याकडे बंदर, नदी परिवहन, माहिती व प्रसिद्धी, सार्वजनिक तक्रारी, एनआरआय, राजभाषा, प्रोव्हेदोरिया ही खाती देण्यात आली आहेत. पी. कुणाल यांची मुख्य निवडणूक अधिकारी आणि सचिव (निवडणूक) या पदांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आयएएस रूपेश ठाकूर यांच्याकडे राज्यपालांच्या सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. अमेय अभ्यंकर यांच्याकडे माहिती तंत्रज्ञान, नागरी पुरवठा, कामगार व रोजगार आणि छपाई या खात्याचा ताबा देण्यात आला आहे. नीला मोहनन यांच्याकडे शिक्षण, महसूल, उद्योग या खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. गोविंद जैस्वाल यांच्याकडे वाहतूक, कायदा, वजनमाप, कंपनी व बाष्पक, पुरातत्त्व, संग्रहालय, गॅझेटियर, खास सचिव (दक्षता) ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. जे. अशोककुमार यांची मुख्यमंत्र्यांचे सचिवपदाबरोबरच आरोग्य, क्रीडा व युवा व्यवहार, पर्यटन, नोडल अधिकारी स्वच्छ भारत मिशन या विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. संजय गिहीर यांच्याकडे जलस्रोत, गृहनिर्माण, पंचायत, ग्रामीण विकास यंत्रणा, पशुसंवर्धन आणि गोवा राज्य बालहक्क आयोगाच्या सदस्य सचिव पदाचा अतिरिक्त ताबा देण्यात आला आहे. चोखा राम गर्ग यांच्याकडे आदिवासी कल्याण, कला व संस्कृती, महिला व बालकल्याण, कौशल्य विकास, हस्तकला तसेच गोवा लोकसेवा आयोगाच्या सचिवपदाचा ताबा देण्यात आला आहे. अंजली शेरावत यांची खास सचिव (गृह), खास सचिव (कार्मिक) तसेच क्रीडा व युवा विभागाच्या संचालकपदाचा अतिरिक्त ताबा देण्यात आला आहे.

पर्यावरण खात्याच्या संचालकपदी रवी झा यांची नियुक्ती
सरकारने पर्यावरण खात्याच्या संचालकपदी आयएएस अधिकारी रवी झा यांची काल नियुक्ती केली आहे. यासंबंधीचा आदेश अवर सचिव (कार्मिक – हरिष अडकोणकर यांनी जारी केला आहे. तसेच, अबकारी आयुक्त अमित सतीजा यांच्याकडे गोवा मनोरंजन संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारिपदाचा अतिरिक्त ताबा देण्यात आला आहे.