सध्या तरी मांगूर हिल ‘निर्बंधित क्षेत्र’ः मुख्यमंत्री

मांगूर हिल येथे अजूनही कोरोनाचा फैलाव चालूच आहे. त्यामुळे निर्बंधीत क्षेत्र असलेले मांगूर हिल एवढ्यात अनिर्बंधित क्षेत्र घोषित केले जाणार नाही, पंधरा दिवसांनंतर याबाबत निर्णय घेऊ, असे काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

निर्बंधित क्षेत्र घोषित करण्यात आलेल्या मांगूर हिलचा फेरआढावा घेण्यासाठी काल पर्वरी येथील मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील माहिती दिली.

कोरोना चाचणी केल्यास मुभा
मांगूर हिल येथील जे लोक स्वतःची कोरोनासाठीची चाचणी करून घेण्यासाठी पुढे येतील व ज्यांचा अहवाल निगेटिव्ह येईल, अशा लोकांना मांगूर हिल या निर्बंधित क्षेत्रातून बाहेर येण्याची मुभा असेल. तेथून बाहेर येऊन ते आपल्या कामावर रूजू होऊ शकतील. मात्र, त्यांना त्यानंतर मांगूर हिलमध्ये येता येणार नाही, असे सावंत यांनी स्पष्ट केले.