सत्तरीत दोन नवे कोरोना रुग्ण

सत्तरीत कोरोनाचे काल दोन रुग्ण सापडले असून सत्तरीत कोरोनाचे एकूण १४ रुग्ण झाले आहेत. यापूर्वी मोर्ले सत्तरीत आठ, शिरोली दोन व गुळेलीत एक रुग्ण, मलपण येथे एक रुग्ण सापडले होते. काल मोर्ले येथे त्यात एका रुग्णाची भर पडली असून मलपण येथे एक रुग्ण सापडला आहे. मलपण येथे सापडलेला नवीन रुग्ण ही आधीच्या रुग्णाची पत्नी आहे.

सत्तरीत वातावरण भयभीत
सत्तरीत कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने वातावरण भयभीत झाले आहे. काल वाळपई शहरात शुकशुकाट होता. केरी बाजार लॉकडाउन करण्याचा काल चौथा दिवस होता. मोर्ले-सत्तरीत ज्या वाड्यावर कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत त्या वाड्यावर कडकडीत लॉकडाऊन सुरू आहे. तसेच शिरोलीतसुद्धा कडकडीत लॉकडाऊन सुरू आहे. गुळेलीत काल सर्व व्यवहार बंद होते. वाळपई शहरातसुद्धा दुकाने खुली करण्यास व्यापारी भीत असून अनेकांनी आपले व्यवसाय अजूनही सुरू केलेले नाही. दुकानातील कामगार सुद्धा कामाला यायला तयार नाहीत.