संघ नेत्यांवरील हल्ल्यांच्या निषेधार्थ भाजपतर्फे मोर्चा

केरळ राज्यात कम्युनिस्टांकडून संघाच्या नेत्यांवर हल्ले होण्याच्या ज्या घटना घडत आहेत त्याच्या निषेधार्थ १६ रोजी भाजपने पणजीत निषेध सभा व निषेध मोर्चाचे आयोजन करण्याचा निर्णय काल झालेल्या भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत झाला.

राज्य कार्यकारिणीच्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रदेश भाजप अध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी ही माहिती दिली. तसेच ३१ रोजी वल्लभ भाई पटेल यांच्या जयंती दिनानिमित्त ‘रन फॉर युनिटी’चेही आयोजन करण्याचा निर्णय कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला. रन फॉर युनिटीचे राज्यभरात आयोजन करण्यात आले असल्याचे तेंडुलकर यांनी सांगितले. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपवर मतदारांनी विश्‍वास दाखवल्याबद्दल मतदारांचे आभार मानण्याचा ठरावही यावेळी संमत करण्यात आला.
मनोहर पर्रीकर यांच्या खंबीर नेतृत्वामुळे सरकारची आर्थिक गाडी रुळावर आल्याबद्दल तसेच प्रशासनातील भ्रष्टाचार दूर झाल्याबद्दल कार्यकारिणीतर्फे सरकारची प्रशंसाही करण्यात आली.