श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी सँटनरचे न्यूझीलंड संघात पुनरागमन

पुढील महिन्यात श्रीलंकेत होणार्‍या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंडच्या संघाची घोषणा करण्यात आली असून डावखुरा फिरकीपटू मिचेल सँटनरचे पुनरागमन झाले आहे. सँटनरने आपला शेवटचा कसोटी सामना डिसेंबर २०१७मध्ये खेळला होता.
वन-डे आणि टी-२० क्रिकेटमधील न्यूझीलंड संघाचा नियमित सदस्य असलेल्या सँटनरला घुडघ्याच्या दुखापतीमुळे कसोटीपासून दूर रहावे लागले होते. आणखी डावखुरा ऑफस्पिनर एजाज पटेल आणि लेग स्पिनर टॉड ऍसल यांचाही या १५ सदस्यीस न्यूझीलंड संघात समावेश झालेला आहे. संघाचे नेतृत्व केन विल्यमसन करणार आहे.

घोषित संघ पुढील प्रमाणे ः केन विल्यमसन (कर्णधार), टॉड ऍसल, टॉम ब्लंडेल, ट्रेंट बोल्ट, कॉलिन डी ग्रँडहोम, टॉम लॅथम, हेन्री निकोलस, एजाज पटेल, जीत रावल, विल सोमरविले, मिचेल सँटनर, टिम साऊथी, रॉस टेलर, नील वॅग्नर, बी.जे. वॉटलिंग.