ब्रेकिंग न्यूज़

श्रीकांत, प्रणिथ, प्रणॉय दुसर्‍या फेरीत

विश्‍व अजिंक्यपद स्पर्धेत काल सोमवारी सातव्या मानांकित किदांबी श्रीकांत व सोळाव्या मानांकित बी. साई प्रणिथ यांनी परस्पर विरोधी विजयाची नोंद केली. श्रीकांतने आयर्लंडच्या न्हात एनगुएन याचा तीन गेममध्ये १७-२१, २१-१६, २१-६ असा पराभव केला तर प्रणिथने सलग दोन गेममध्ये कॅनडाच्या जेसन अँथनी होशुई याचा खेळ २१-१७, २१-१६ असा खल्लास केला. श्रीकांतसमोर दुसर्‍या फेरीत इस्रायलच्या मिश्‍चा झिल्बरमनच्या रुपात तुल्यबळ प्रतिस्पर्धी असेल. महिला दुहेरीत मेघना जक्कमपुडी व पूर्विशा राम यांनी गुआटेमाला देशाच्या डायना कॉर्लेटो सोटो व निकटे आलेजांड्रा सोटोमायोर यांचा २१-१०, २१-१८ असा पराभव करत आगेकूच केली. त्यांना दुसर्‍या फेरीत आठव्या मानांकित शिहो तनका व कोहारू योेनेमाटो या जपानच्या जोडीशी दोन हात करावे लागणार आहेत. श्रीकांतप्रमाणेच प्रणॉयला तीन गेम झुंजावे लागले. फिनलंडच्या इटू हेनोविरुद्ध पहिला गेम १७-२१ असा गमावल्यानंतर त्याने पुढील दोन्ही गेम २१-१०, २१-११ असे जिंकत पुढील फेरी गाठली. दुसर्‍या फेरीत त्याच्यासमोर चीनचा ११वा मानांकिन लिन डान असेल.