व्हीपीके अर्बन सोसायटीवर सहा महिने निर्बंध

राज्य सहकार निबंधकांनी राज्यातील सहकारी क्षेत्रातील आघाडीवरील व्हीपीके अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीवर सहा महिन्यांसाठी निर्बंध घातले आहेत.

या सोसायटीला नवीन ठेवी स्वीकारण्यास बंदी घालण्यात आली असून पिग्मी घेण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे. केवळ कर्जाशी संबंधित पिग्मी गोळा करण्यास मान्यता दिली आहे. या के्रेडिट सोसायटीची कर्ज देण्याची मर्यादा ५ लाखांवर आणण्यात आली आहे.
यासंबंधीचा आदेश सहकार निबंधक विकास गावणेकर यांनी जारी केला आहे. या संस्थेच्या कारभाराविरोधात दामोदर म्हार्दोळकर व इतरांनी २९ मार्च २०१७ रोजी सहकार निबंधकांकडे तक्रार केली होती.