ब्रेकिंग न्यूज़

व्हाळशी डिचोली अपघातात एक ठार

व्हाळशी डिचोली येथे डिचोली ते म्हपसा या मुख्य रस्त्यावर काल दि. ८ मे रोजी सकाळी झालेल्या एका अपघातात व्हाळशी येथे राहणारे प्रेमानंद पांडुरंग सावंत यांचा म्रूत्यू झाला. रस्ता ओलांडताना त्यांना भरधाव वेगाने येणार्‍या स्कुटरने जोरदार धडक दिली.

सदर घटना बुधवारी सकाळी घडली. उपलब्ध माहितीनुसार प्रेमानंद सावंत हे मुळ केळ पीर्ण येथील असून गेली अनेक वर्ष ते व्हाळशी डिचोली येथे राहत होते. सकाळी घरापासून जवळच रस्त्याच्या पलिकडे असलेल्या एक दुकानावरून भाजी घेऊन ते घरी येण्यासाठी रस्ता ओलांडत असताना डिचोलीहून म्हापसा बाजूने भरधाव वेगाने जाणार्‍या जीए १२ बी ३२७२ या स्कुटरने त्यांना जोरदार धडक दिली.

या धडकेत ते गंभीर थखमी अवस्थेत रस्त्यावर पडले. लागलीच त्यांना डिचोली सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. येथे प्राथमिक उपचार करून त्यांना अधिक उपचारासाठी बांबोळी येथील गोमेकोत नेण्यात येत असताना वाटेत त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक भारत खरात करीत आहे. उत्तरीय तपासणीअंती मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.