वॉर्नची गोलंदाजी खेळायला कठीण जायचे

>> विराटने केले स्पष्ट

टीम इंडियाचा आक्रमक कर्णधार विराट कोहली हा गोलंदाजांसाठी सध्याच्या काळातील सर्वांत धोकादायक फलंदाज मानला जातो. त्याची गणना वर्तमान काळातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांमध्ये केली जात आहे. बर्‍याच गोलंदाजांसाठी तो कर्दनकाळ ठरत असतो. परंतु विराटने मात्र ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज लेगस्पिनर असलेल्या शेन वॉर्नची गोलंदाजी खेळणे त्याला कठीण व्हायचे, असे सुनील छेत्रीबरोबर लाईव्ह चॅट करताना सांगितले.

विराटने आयपीएलमध्ये वॉर्नसमोर खेळताना बरेच कठीण जात होते, असे स्पष्ट केले. आयपीएलच्या पहिल्याच सत्रात २००९ साली रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून खेळताना मी वॉर्नसमोर मूर्ख ठरलो होतो. परंतु त्यानंतर मात्र २०११मध्ये त्याला मला बाद करता आले नाही. असे असले तरी मीदेखील त्याच्याविरुद्ध अधिक धावा केल्या नाहीत. सामन्यानंतर वॉर्न माझ्याजवळ आला आणि म्हणाला की, गोलंदाजाच्या पाठीमागे कधीच काही बोलू नको. परंतु मी यावर हसलो होतो आणि त्याचे म्हणणे ऐकले नव्हते, असे विराटने सांगितले.