वुमन्स टी-२० चॅलेंज स्पर्धेचे संघ घोषित

>> स्मृती, हरमनप्रीत, मितालीकडे नेतृत्व

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आयपीएलच्या धर्तीवर भारतात एका छोटेखानी ‘वुमन्स टी-२० चॅलेेंेज’ स्पर्धेचे आयोजन केले आहे. ६ ते ११ मे या कालावधीत तीन संघांमध्ये ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे.
या स्पर्धेत सुपरनोव्हाज, ट्रेलब्लेझर्स आणि व्हेलॉसिटी हे ३ संघ एकमेकांशी लढणार आहे. स्ममृती मंधाना (ट्रेलब्लेझर्स), हरमनप्रीत कौर (सुपरनोव्हाज) आणि मिताली राज (व्हेलॉसिटी) या तिघी संघाचे नेतृत्व करणार आहेत. प्रत्येक संघात ४ परदेशी महिला क्रिकेटपटूंचा समावेश करण्यात आला आहे. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर हे सामने खेळवण्यात येणार आहेत.
‘वुमन्स टी २० चॅलेंज’चे सामने पुढील प्रमाणे ः ६ मे सुपरनोव्हाज वि. ट्रेलब्लेझर्स, ८ मे ट्रेलब्लेझर्स वि. व्हॅलोसिटी, ९ मे सुपरनोव्हाज वि. व्हॅलोसिटी, ११ मे अंतिम सामना.

संघ पुढील प्रमाणे ः सुपरनोव्हाज हरमनप्रीत कौर (कर्णधार), अनुजा पाटील, अरुंधती रेड्डी, चमारी अट्टापटू (श्रीलंका), जेमेमा रॉड्रिगीज, लीया ताहुहू (न्यूझीलंड), मानसी जोशी, नाताली स्कीव्हर (इंग्लंड), पूनम यादव, प्रिया पुनिया, राधा यादव, सोफी डिवाईन (न्यूझीलंड), तानिया भाटिया (यष्टिरक्षक), डब्लूव्ही रमण (प्रशिक्षक).

ट्रेलब्लेझर्स – स्मृती मंधाना (कर्णधार), भारती फुलमती, दयालन हेमलता, दीप्ती शर्मा, हरलीन देवोल, जेसिया अख्तर, झुलन गोस्वामी, आर. कल्पना (यष्टिरक्षक), राजेश्वरी गायकवाड, शकेरा सेलमन (वेस्ट इंडीज), सोफी इस्लेस्टोन (इंग्लंड), स्टेफनी टेलर (वेस्ट इंडीज), सुझी बेट्‌स (न्यूझीलंड), बिजू जॉर्ज (प्रशिक्षक).

व्हॅलोसिटी – मिताली राज (कर्णधार), अमेलिया केर्र (न्यूझीलंड), डॅनियल व्हाईट (इंग्लंड), देविका वैद्य, एकता बिष्ट, हायली मॅथ्यू (वेस्ट इंडीज), जहनारा आलम (बांगलादेश), कोमल झांझड, शफाली वर्मा, शिखा पांडे, सुषमा वर्मा (यष्टिरक्षक), सुश्री देव्यांशी, वेदा कृष्णमूर्ती, ममता माबेन (प्रशिक्षक).