ब्रेकिंग न्यूज़

विश्‍वजित राणे अपात्रता प्रकरणी २२ रोजी निवाडा

आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांच्याविरोधातील अपात्रता याचिकेवरील युक्तिवाद काल पूर्ण झाला असून येत्या २२ मे रोजी निवाडा जाहीर केला जाणार आहे, अशी माहिती हंगामी सभापती मायकल लोबो यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.
सांगेचे अपक्ष आमदार प्रसाद गावकर यांनी जुलै २०१७ मध्ये आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांच्याविरोधात अपात्रता याचिका सभापतींसमोर दाखल केली आहे. या अपात्रता याचिकेवरील पहिली सुनावणी ऑगस्ट २०१७ आणि दुसरी सुनावणी सप्टेंबर २०१७ रोजी घेण्यात आली होती. यावेळी याचिकादार आणि मंत्री राणे यांच्या वकिलांनी लेखी स्वरूपात आपली बाजू मांडली होती. या याचिकेवर युक्तिवाद झाला नव्हता. गोवा विधानसभेच्या २०१७ च्या निवडणुकीत कॉंग्रेसच्या उमेदवारीवर निवडून आलेल्या विश्‍वजित राणे यांनी आमदारकीची शपथ घेतल्यानंतर काही वेळातच आमदारकीचा राजीनामा दिला होता.