ब्रेकिंग न्यूज़

विरोधकांची महायुती ही अयशस्वी कल्पना ः मोदी

नवी दिल्ली
कॉंग्रेससह विविध विरोधी पक्षांनी एक होऊन महायुती करण्याचा केलेला खटाटोप ही एक अपयशस्वी कल्पना असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल भाजप कार्यकर्त्यांशी मोदी ऍपवरून संवाद साधताना केली. हे विविध पक्ष परस्परांशी भांडत असतात. मात्र त्यांना जेव्हा सत्ता स्थापनेची जाणीव होते त्यावेळी ते एकत्र येतात आणि कर्नाटकमधील विद्यमान सरकार हे याबाबतचे उत्तम उदाहरण असल्याचे ते म्हणाले.