विनोद देसाईविरुद्ध अजामीनपत्र अटक वॉरंट

नोकर्‍यांचे आमिष दाखवून युवकांना लाखो रु. चा चुना लावल्याचा आरोप असलेला संशयित आरोपी विनोद देसाई हा न्यायालयात हजर न राहिल्याबद्दल पणजीचे प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी आरतीकुमार नाईक यांनी काल त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट काढण्याचा आदेश दिला. यासंबंधीची पुढील सुनावणी आता ५ जुलै रोजी होणार आहे.

गेल्या नोव्हेंबर महिन्यात मेर्विन फर्नांडिस यांनी आपले वकील आयरीश रॉड्रिग्ज यांच्याद्वारे विनोद देसाई याच्याविरुद्ध न्यायालयात खटला गुदरला होता. आपणाला सरकारी नोकरी देण्याचे आमिष दाखवून त्याने आपणाकडे सहा लाख रु. ची मागणी केली व आगाऊ रक्कम म्हणून २ लाख रु. घेतले होते, असे फर्नांडिस यांनी तक्रारीत नमूद केले होते.