विनयभंगप्रकरणी मोन्सेरातांसह तिघांना सशर्त अटकपूर्व जामीन

येथील जुन्या सचिवालयाजवळील बिग डॅडी कॅसिनो कार्यालयाबाहेर महिलेच्या कथित विनयभंग प्रकरणी पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात, महापौर उदय मडकईकर आणि माजी महापौर यतीन पारेख यांना उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाने सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला.

या प्रकरणी एका महिलेने पणजी पोलिस स्टेशनवर तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमुळे आमदार मोन्सेरात, महापौर मडकईकर आणि माजी महापौर पारेख यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती.