विधानसभेचे पावसाळी अधिवेशन दोन आठवडे

गोवा विद्यापीठाचे २७ जुलैपासून सुरू होणार असलेले पावसाळी अधिवेशन हे तीन नव्हे तर दोन आठवडे चालणार असल्याचा खुलासा काल सभापती राजेश पाटणेकर यांनी केला.

सोमवारी अनधिकृतपणे पत्रकारांशी बोलताना राज्य विधानसभेचे होऊ घातलेले पावसाळी अधिवेशन हे तीन आठवड्यांचे असण्याची शक्यता पाटणेकर यांनी व्यक्त केली होती. मात्र, काल त्याबाबत खुलासा करताना हे अधिवेशन दोनच आठवडे घेण्याचे निश्‍चित करण्यात आले असल्याचे ते म्हणाले. या अधिवेशनात अंदाजपत्रक संमत करण्यात येणार आहे.