विधानसभेचे पावसाळी अधिवेशन २७ जुलै पासून

 

गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन २७ जुलैपासून सुरू होणार आहे, अशी माहिती सभापती राजेश पाटणेकर यांनी काल अनधिकृतरित्या पत्रकारांशी बोलताना दिली. हे अधिवेशन किती दिवसांचे असेल हे अद्याप ठरलेले नाही. मात्र, ते तीन आठवड्यांचे असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. यावेळच्या अधिवेशनात अर्थसंकल्पाला संमती देण्यात येणार आहे.