विद्यार्थी खूनप्रकरणी पालकांवर लाठीमार

विद्यार्थी खूनप्रकरणी पालकांवर लाठीमार

गुरगाव येथील रायन इंटरनॅशनल स्कूलच्या ७ वर्षीय विद्यार्थ्यांचा या शाळेतच खून झाल्याप्रकरणी काल पालकांच्या निदर्शनांना हिंसक वळण लागल्यानंतर पोलिसांनी निदर्शकांवर लाठीमार केला. यावेळी निदर्शकांनी नजीकच्या दारूच्या दुकानाला आग लावली, तसेच शाळेच्या खिडक्यांचा काचा फोडल्या. या खूनप्रकरणी आरोपीस अटक करण्यात आली असून त्याला एका आठवड्याच्या आत न्यायालयात उभा करण्यात येईल, असे हरयाणाचे शिक्षणमंत्री राम विलास शर्मा यांनी सांगितले.