विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू

खोर्ली म्हापसा येथील प्रसाद भालचंद्र आरोलकर (२६) या युवकाला विजेचा धक्का बसून त्याचा जागीच मृत्यू झाला.काल रविवारी सकाळी पावणे नऊच्या सुमारास ही घटना घडली. प्रसाद हा काल रविवारी सकाळी घराच्या छपरावर प्लास्टिक घालण्यासाठी लोखंडी शिडी घेऊन जात असताना घराजवळच्या विजेच्या तारांना ती शिडी लागली व त्यामुळे धक्का बसून प्रसाद याचे निधन झाले. कुटुंबीयांनी त्याला पेडे जिल्हा इस्पितळात नेले असता तेथील डॉक्टरांनी तो मृत झाल्याचे सांगितले