विकास दुबेला साथ देणार्‍या पोलीस अधिकार्‍यांना बेड्या

कुख्यात गँगस्टर विकास दुबेशी असलेल्या संबंधांप्रकरणी कानपूर पोलिसांनी बुधवारी चौबेपूर पोलीस ठाण्याचे एसएचओ विनय तिवारी आणि उपनिरीक्षक के. के. शर्मा या दोघांना अटक केली. विकास दुबेवर आठ पोलिसांची हत्या केल्याचा आरोप आहे. उत्तरप्रदेश पोलिसांकडून विकास दुबेचा शोध सध्या सुरू आहे.

उत्तरप्रदेश पोलिसांच्या विशेष पथकाने हमिदपूर जिल्ह्यात चकमकीत विकास दुबेचा जवळचा सहकारी अमर दुबेला ठार केले आहे. या हत्याकांडानंतर तिवारी आणि शर्मा दोघांना निलंबित करण्यात आले होते. शुक्रवारी मध्यरात्री विकास दुबेच्या ठिकाणावर छापा मारण्यात येणार होता. पण त्याआधीच त्याला माहिती मिळाली. विनय तिवारी आणि के. के. शर्मा या दोघांवर विकास दुबेला छापेमारीची कारवाई होण्याआधीच माहिती दिल्याचा आरोप आहे.