विकासदर ६ टक्क्यांपेक्षा खाली

>> मोदी सरकारसमोर आव्हान

केंद्रात दुसर्‍यांदा सत्तेत आलेल्या मोदी सरकारला पहिल्याच दिवशी आर्थिक पातळीवर मोठा झटका बसला आहे. २०१८-१९ या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत आर्थिक विकासदर ६ टक्क्यांपेक्षाही खाली गेला आहे. जानेवारी ते मार्च या तिमाहीत देशाचा आर्थिक विकासदर ५.८ टक्के इतका होता.

२०१७-१८ या आर्थिक वर्षात ७.२ टक्क्यांवर असणारा जीडीपी दर २०१८ -२०१९ या आर्थिक वर्षात ६.८ टक्क्यांवर आला आहे. शेती आणि निर्मिती क्षेत्रातील खराब प्रदर्शनाचा जीडीपाला फटका बसला असल्याची अधिकृत माहिती काल देण्यात आली आहे.

४५ वर्षांतील
सर्वाधिक बेरोजगारी
एकीकडे आर्थिक विकासदर (जीडीपी) घसरला असताना दुसरीकडे बेरोजगारीही मोठ्या प्रमाणात वाढल्याचे समोर आले आहे. २०१७-१८ या आर्थिक वर्षातील बेरोजगारीची आकडेवारी समोर आली आहे. २०१७-१८ मध्ये बेरोजगारी ६.१ टक्क्यांवर पोहोचली आहे. गेल्या ४५ वर्षांतील ही देशातील सर्वाधिक बेरोजगारी आहे. १९७२-७३ नंतर प्रथमच बेरोजगारीचा आकडा ६ टक्क्यांवर पोहोचला आहे.