ब्रेकिंग न्यूज़

वर्ल्ड कप ः भारताचा दिमाखदार शुभारंभ

सामनावीर रोहित शर्माच्या नाबाद (१२२) शतकाच्या जोरावर येथे सुरू असलेल्या विश्‍वचषक २०१९ स्पर्धेतील सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ६ गड्यांनी पराभव करीत भारताने आपल्या मोहिमेचा दिमाखदार शुभारंभ केला. प्रथम फलंदाजीस उतरल्यानंतर द. आफ्रिकेने भारतासमोर विजयासाठी २२८ धावांचे आव्हान ठेवले होते. भारताने हे उद्दिष्ट ४७.३ षटकांत ४ गडी गमावून पार केले. रोहित शर्माची नाबाद शतकी खेळी १३ चौकार व २ उत्तुंग षटकारांनी सजली. द. आफ्रिकेचा या स्पर्धेतील हा सलग तिसरा पराभव ठरला. द. आफ्रिकेला २२७ धावांत रोखताना फिरकी गोलंदाज यजुवेंद्र चहलने ५१ धावांत ४ गडी टिपले. विजयी मजल मारताना महेंद्रसिंग धोनीने शर्माला मोलाची साथ दिली.