ब्रेकिंग न्यूज़

वंध्यत्वात स्त्रियांवरील उपचार

  • डॉ. मनाली म. पवार
    (गणेशपुरी-म्हापसा)

वंध्यत्वामध्ये स्त्रियांची चिकित्सा किंवा उपचार तसे गुंतागुंतीचेच असतात. कारण स्त्रियांमधील वंध्यत्वामध्ये विविध कारणांचा आढावा घेतल्यास लक्षात येईल की, कारणेही तशी असंख्य असतात. सार्वदेहिक कारणांपासून ते विशिष्ट कारणांपर्यंत होय. त्यामुळे खूप विचार करून योग्य ते निदान करून उपचार करावे लागतात. चिकित्सा असाध्य असते असे नाही, पण लागतो तो डॉक्टरांप्रती रुग्णाचा विश्‍वास व सांगितलेल्या प्रत्येक गोष्टींचे पथ्यपालन.

स्त्री वंध्यत्वाची चिकित्सा सुरू होते ती आश्‍वासन चिकित्सेपासून. हे कार्य फक्त डॉक्टरांचेच नसून घरातील इतर परिवाराचेही आहे. रुग्णेला दोष देण्यापेक्षा, टोचून बोलण्यापेक्षा समजून घेऊन उपचार घेण्यास प्रोत्साहीत केल्यास स्त्रियांचे मानसिक आरोग्य सुधारते, रुग्णा उपचारांप्रती सकारात्मक होते, जी उपचारांची पहिली पायरी आहे. उपचारांमधील काळ हा खूप महत्त्वाचा आहे. हा काळ अगदी दोन महिन्यांपासून दोन वर्षांपर्यंतही लांबू शकतो. याबद्दल रुग्णेला माहिती असणे आवश्यक आहे.

शोधन चिकित्साः
आयुर्वेद शास्त्रामध्ये वंध्यत्वाची सुरुवात ही दोघांच्याही शरीरशुद्धीपासून सांगितली आहे. पंचकर्मे उपचारांद्वारे प्रथम शरीरशुद्धी करावी. रुग्णा स्थूल असल्यास प्रथम मेदक्षरण करावे व कृथ असल्यास बृहण चिकित्सा द्यावी. इतर सार्वदेहिक काही आजार असल्यास त्याचे निवारण करावे. स्नेहल-स्वेदन उपक्रमानंतर वमन, विरंचन, बकि, रक्तमोक्षण, नस्य अशा पंचकर्मांच्या सहाय्याने शरीर शुद्ध करावे. क्वचितप्रसंगी काही रुग्णांना पंचकर्मे न करता विरेचन, बस्तीनेही फरक पडू शकतो. शरीरातील दोषस्थिती समःस्थितीत आणल्यावर चिकित्सा करणे सोपे जाते. स्त्री प्रजनन-अवयव हे अपान वायूच्या कक्षेत येत असल्याने ‘बस्ति’ ह्या उपक्रमाला विशेेष महत्त्व आहे. अनुवासन, निरुह बस्तीबरोबर ‘उत्तर बस्ती’ला विशेष महत्त्व आहे.

– उत्तरबस्ती ः स्त्रियांच्या संदर्भात योनी, गर्भाशय इत्यादी जननेंद्रियांचे आरोग्य नीट रहावे आणि संततीप्राप्तीच्या दृष्टीने त्यांचे कार्य संतुलित असावे यासाठी आयुर्वेदशास्त्रामध्ये उत्तरबस्ती हा विशेष उपक्रम सांगितला आहे. स्नेहल, स्पंदन, निरुह, अनुवातन झाल्यावर उत्तरहस्तीद्वारा शतपाकी बला तेल, स्त्रोतोरोध तीव्र असल्यास सहचर तेल, माषादी तेल, नारायण तेल हे गर्भाशयमुखातून गर्भाशयात प्रविष्ट केल्यास (त्यासाठी योग्य ती काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे.) याला उत्तरबस्ती म्हणतात. हे अंतस्त्वचेवर कार्यकारी होऊन त्याचे संरंभ, लाली नाहीशी होऊन, आर्तववाहिन्यांमधून शोषले जाऊन तेथील वाताची गमनागम प्रक्रिया सुधारते.

– स्थानिक चिकित्सा ः स्नेहपिचुधारण, योनिप्रक्षालन, स्वेदन, धूपन यांचा अंतर्भाव स्थानिक चिकित्सेमध्ये येतो.
– स्थानिक चिकित्सेमध्ये पिचुधारणासाठी एलादी तेल, यष्टीमधु तेल, शतधौत, धृत, पंचवल्कम सिद्ध तेल, आवला तेल किंवा तीळ तेलाचा उपयोग अवस्था व लक्षणानुरुप उपयोग करावा.
– योनिधावनासाठी न्यग्रोधादी गण, पंचवल्कम, त्रिफला, दशमूल, अरजदिंची वापर करावा.
– धूपनासाठी कोष्ठ, धूप, चंदन, अगरु यांच्या चूर्णाचा वापर करावा.

– त्र्यावर्ता योनी चिकित्सा
वंध्यत्वाचा विचार करत असताना नेमकी दृष्टी कोणत्या भागी झालेली आहे हे निदान होणे महत्त्वाचे आहे. दोषदृष्टी झाल्यानंतर दोषांचा प्रवाह बाह्य आवर्ताकडून म्हणजे प्रथमावर्ताकडून तृतीयावर्ताकडे आहे का तृतीयावर्ताकडून प्रथमावर्ताकडे आहे हे ओळखणेच फार महत्त्वाचे आहे, कारण त्यानुसार औषधयोजना बदलते.

– बाह्ययोनी
बाह्ययोनी संकोच असल्यास व स्त्री कृश असल्यास शतावरी, अश्‍वगंधा, गोक्षुर, पूर्णचंद्रोदय इत्यादी औषधांचा उपयोग करून बृहण चिकित्सा करावी व स्त्री स्थूल असल्यास चंग्रप्रभा, शिलाजम्, कांचनार, गुग्गुळ, मेदोपाचक गण यांचा उपयोग करून स्नेहाचा पिचू ठेवावा.
– वाताशिवाय दृष्टी होत नाही म्हणून प्रथम निरूह, अनुवासन, विरेचन देऊन वातानुलोमन झाल्यावर आमपाचक, मेदोपाचक द्रव्याचा पोटातून वापर करावा.
– योनिकर्कशता, रोक्ष्य असल्यास संभोगकष्टता आढळते. अशावेळी निरुह, अनुवासन बस्ती प्रथम देऊन विरेचन द्यावे आणि महायोगराज गुग्गुळ, योगराज गुग्गुळ, आरोग्यवर्धिनी, शतावरी, अश्‍वगंधा, दशमूळ, त्रिफळा अंतर्बाह्य उपयोग करावा. स्नेह पिचूचा उपयोग या ठिकाणी उत्तम होतो. त्यासाठी बला, एरंड, तिळ तेलाचा उपयोग करावा. पोटातून घेण्यासाठी फलधृत, शतावरीधृत, त्रिफलाधृत वापरावे.
– बाह्ययोनीभागी गोथ असल्यास, शोध कशामुळे निर्माण झाला आहे. याचा पूर्ण विचार करावा. विस्फोट, गळू वगैरे झाल्याने सूज असल्यास प्रलेप, प्रदेहासाठी हरिद्रा, पुनर्नवा, अनंता यांचा उपयोग करावा. मुस्ता, वाळा, नागरमोथा, गोक्षुर, पुनर्नवा आणि बला यांचा काढा द्यावा. फिरंग, उपदेश असल्यास त्रिवंग अस्म, चंद्ररप्रघागुटी या औषधांबरोबर गुळवेल, अनंतफूल, गोक्षूर यांचा काढा, चंदनवाळा यांचा प्रलेप आणि चंदनासव, उशीरासव यांचा उपयोग करावा.
बाह्ययोनी लाली, दाह व वेदना असल्यास चंदन, वाळा, अनंता, मंंजिष्ठा आदी शीत द्रव्यांचा लेप लावावा. शांतोदकाचा परिषेक घ्यावा. पोटात घेण्यासाठी चंदनासव, उशीरासव वापरावे. मृदुविरेचन सतत चालू ठेवावे. शतावरी कल्पाचे पाणी, धने-जिर्‍याचे पाणी, डाळिंब, आवळा, लिंबू सरबत प्रकृतिनुरुप प्यावे. आत्यंतिक दाह असल्यास दुर्वांचा रस एक चमचा तूप, अर्धा चमचा मिसळून घ्यावा.
अतिपिच्छिल श्‍वेतद्राव, योनिकंडू असल्यास क्लेदाचे उपशोषण होण्यासाठी वरा, अनंतमूळ आणि लोध्र यांच्या क्वाथाने योनिभाग स्वच्छ करून योनीभागी मुक्ता, वाळ, चंदन यांचे लेप व प्रदेह करावत. पोटातून घेण्यासाठी चंद्रप्रभा, आरोग्यवर्धिनी, गुग्गुळ, पंचवल्कल, गंधकरसायन, रक्तपाचक चूर्णाचा वापर करावा.

२) द्वितियावर्त- विवाहाची वाढलेली वयोमर्यादा, शिक्षणाचा ताण, दुचाकी प्रवासामुळे अपत्यपथात संकोच व दाढर्य निर्माण होते व वंध्यत्व येते. ते टाळण्यासाठी एक चमचा बला तेल व एक चमचा एरंड तेल याचा चमक स्नेह जेवणापूर्वी घ्यावे. अनुबसन बस्सी, स्नेहपिचू धारण यांचा उपयोग करावा. औषध योजना करताना शतावरी, अश्‍वगंधा, दशमूल, ज्येष्ठमध, महावातविश्‍वस, त्रिफला, मासपाचक चूर्ण यांचा उपयोग करावा. याने संकोच नाहीसा होऊन मैथून योग्य प्रकारे होऊन गर्भधारणा लगेच होते.
– अपत्यपथात अत्याधिक जौष्ठय असल्यास प्रथम विरेचन मग निरूह आणि अनुवासन अशा क्रमाने बस्ती द्यावी. सार्वदेहिक पित्ताची दृष्टी लक्षात घेऊन सूतशेखर, प्रवाळ पंचामृत, बहावा, त्रिफला अविपत्तिकर चूर्ण, कामदुधा, अनंतफूल, गुळवेल या औषधांचा योग्य तो वापर करावा. बाहाव्यासारखे सौम्य विरेचन सतत चालू ठेवावे. रक्तपाचक औषधांचा वापर करावा.
गर्भाशय मुखावर व्रण, लाली असल्यास आमपाचक, वातानुलोमक, रक्तप्रसादक आणि पित्तशामक औषधांचा वापर करावा. विरेचनासाठी निशोत्तर, बदावा यांचा उपयोग करावा. यष्टीमधू, पंचवस्कष, न्यग्रोधादी गण यांचा वापर योनिधावासाठी करावा.

गर्भाशय मुख संपूर्णपणे श्‍वेतस्त्रावाने लडबडलेले आढळल्यास आमपाचक, क्लेदनाशक, शोधहन आणि अग्निवर्धक चिकित्सा करावी. दशमूल + त्रिफळा क्वाथाचा निरुह बस्ती, नितंर विरेचन, धावनासाठी सूरसादि गटांतील औषधांचा वापर करावा. धूपनासाठी कोष्ठ, धूप, चंदनाचा वापर करावा. पोटात घेण्यासठी मेदोपाचक, चंद्रप्रभा, गुग्गुळाचा वापर करावा.
३) तृतीयावर्त ः ह्यात गर्भाशय, आर्तववाहिन्या, फलकोष इतका भग येतो. गर्भाशयाच्या अंतस्त्वचेवरील दुष्टी, औषधी काढ्यांनी स्वेदन व धूपन केल्याने गर्भाशयाच्या बाहेरील भागी फेकली जाते. त्यानंतर विरेचन, बस्तीने हे दोष शरीराबाहेर फेकले जातात
आर्तववाहिन्यांच्या ठिकाणी मार्गावरोध किंवा अडथळा असल्यास क्षारतेल, बस्त्या तेल यांची उत्तर बस्ती दिली जाते. त्याचबरोबर कांचनार गुग्गुळ, लताकरंज सारख्या औषधांचा उपयोग होतो.

अंतफलाच्या आसंमंतातील केशवाहिन्यांमध्ये क्लेदाची संचिती झाल्यास आर्तवबीज अकार्यक्षम होते. अशावेळी उण द्रव्यांनी सिद्ध तेलाचा किंवा तुपाचा वापर करावा. स्नेहविचुधारण, योनिप्रक्षालन, यनिधावन आणि धूपन अशी चिकित्सा करून बीज सबल होण्यासाठी रसायन औषधांचा वापर करावा. यासाठी पोटातून औषधे देत असताना खारीक, खोबरे, अहळीव, खसखस, डिंक, तीळ, माष, त्रिकटू, गुडूची मुस्ता, आमलकी, या रसायन आमपाचक औषधांचा उपयोग प्रथम करून मग पुष्पधन्वारक वृष्पवटी, लघुमालिनी वसंत, सुवर्णमालिनी वसंत अशा रसायन औषधांचा उपयोग करावा.
पॉलिसिस्टिक ओव्हॅरिन सिंड्रोम असेल तर षड्‌रसात्मक आहार, शतावरी, शतपुष्पा, इत्यादी द्रव्ये वापरून सहचरतैल, मधनारायण तैलाची उत्तर बस्ती द्यावी.

ऋतुकालाचे महत्त्व
वंध्यत्वामध्ये चिकित्सेच्या दृष्टीने ऋतुकालाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा ऋतुकाल ऋतुचक्राच्या कालावधीप्रमाणे बदलत असतो, तीन दिवसांच्या ऋतुचक्रात हा काल साधारण पाळीच्या दहाव्या दिवसापासून विसाव्या दिवसापर्यंंत असू शकतो. ह्या काळात गर्भधारणेसाठी प्रयत्न करत असताना समागम करावा.
लैंगिक चिकित्सा ः उत्तान स्थितीत मैथुन करून बीज ग्रहण करावे. स्थित असल्याने अपान वायूच्या प्राबल्याखाली येते म्हणून वंध्यत्वामध्ये बस्ती ही महत्त्वाची चिकित्सा आहे.
रसायन चिकित्सा ः सार्वदेहिक व गर्भाशयाच्या आरोग्यासाठी सुवर्णकल्प, शतावरी, आमलकी, अश्‍वगंधा, गोक्षुरादि रसायन कल्पही महत्त्वाची आहेत.
अशाप्रकारे विविधांगांनी स्त्रीच्या वंध्यत्वाचा विचार करून औषध योजना करावी.