लेसर शस्त्रांच्या आगमनाची नांदी

  • कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त)

लेसर किरणे सोडणारी शस्त्रे केवळ चित्रपटात दिसल असली, तरी प्रत्यक्षात अशी शस्त्रे विकसित करण्याचे प्रयत्न जगात अनेक ठिकाणी सुरू आहेत. या किरणांच्या अचूक मार्‍याबद्दल आणि परिणामकारकतेबद्दल शस्त्रनिर्मिती करणार्‍या कंपन्यांना खात्री असली, तरी या शस्त्रांविषयी तज्ज्ञांना अनेक शंका आहेत. आगामी काळात लेसर शस्त्रे वापरात येतात का, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

हॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये आपल्याला लेसर किरणे ङ्गेकणारी शस्त्रास्त्रे नेहमी पाहायला मिळतात. त्यातून लाल किंवा हिरव्या रंगांचे प्रकाशझोत बाहेर पडताना दिसतात. वस्तुतः आपल्या वेव्हलेन्थमुळे लेसर बीम अदृश्य असतात; परंतु त्यांची ताकद एवढी अङ्गाट असते की एखादे ड्रोन ते जाळून टाकू शकतात किंवा एखाद्या लोखंडी खांबाला वितळवू शकतात. डसलङ्गोर्ट येथील रेनमेटाल नावाच्या कंपनीने आपल्या प्रतिस्पर्धी कंपन्यांप्रमाणेच लेसर किरणांची शस्त्रास्त्रे तयार करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. एम. बी. डी. ए. या कंपनीसोबत रेनमेटाल कंपनी जर्मनीच्या नौदलासाठी उच्च ऊर्जेने युक्त लेसर इङ्गॅक्टर विकसित करीत आहे. २०२१ पर्यंत एखाद्या युद्धनौकेवर हे अस्त्र बसवून त्याचे परीक्षण करण्यात येईल. हे परीक्षण यशस्वी झाले, तर अशा शस्त्रास्त्रांसाठी कंपनीकडे मागणीचा ओघ सुरू होईल.

जर्मनीकडून काही मोहिमांसाठी लेसर शस्त्रास्त्रांचा वापर केला जाऊ शकतो. जास्तीत जास्त २०२३ पर्यंत अशा शस्त्रांचे परीक्षण पूर्ण करण्याच्या दृष्टीने रेनमेटाल कंपनीने जर्मन आणि डच अधिकार्‍यांशी चर्चा केली आहे. परीक्षणात एम. बी. डी. ए. कंपनीचाही सहभाग असेल. लेसर शस्त्रास्त्रे हा विविध देशांच्या लष्करांच्या दृष्टीने एक औत्सुक्याचा विषय ठरला आहे. अमेरिका, चीन, ब्रिटन, तुर्कस्तान आणि भारतासह अनेक देश लेसर शस्त्रांच्या विकासासाठी प्रयत्नशील आहेत, परंतु आतापर्यंत या शस्त्रांचे परीक्षण सङ्गल झालेले नाही. जर्मनीतील शस्त्रास्त्र निर्मिती करणार्‍या कंपन्या मात्र भविष्यातील एक उपयुक्त आणि आवश्यक तंत्रज्ञान म्हणून लेसर तंत्रज्ञानाकडे पाहत आहेत, परंतु अद्याप या शस्त्रास्त्रांवर बरेच संशोधन होणे बाकी असून, या शस्त्रांचा विकास अद्याप पूर्ण झालेला नाही, असेच त्यांचे म्हणणे आहे.

रेनमेटाल कंपनीचे संचालक अलेक्झांडर ग्राङ्ग यांना मात्र लेसर शस्त्रांचा विकास योग्य प्रकारे चालला असून, त्याला यश येईल अशी खात्री वाटते. लेसर बीम म्हणजे लेसरचे प्रकाशझोत हे अधिक अचूक आणि आवाजविरहित असून, या शस्त्रांचा वापर केल्यास अतिरिक्त नुकसान टाळता येऊ शकते, असे त्यांचे म्हणणे आहे. उत्तर-मध्य जर्मनीतील अंटरलुएस येथे ते कार्यरत आहेत. याच ठिकाणी ५४ चौरस किलोमीटरच्या परिसरात रेनमेटाल कंपनीकडून रणगाडे आणि अन्य आयुधांचे परीक्षण केले जाते. तेथे सुमारे २००० कर्मचारी काम करतात; मात्र त्यापैकी अवघे २० जणच लेसर विभागात कार्यरत आहेत. हा विभाग एका बंगल्यात कार्यरत आहे. या बंगल्याच्या समोर एक विशाल बॉक्स असून, १० किलोवॉट लेसरसह एक मेडिकल मोड्यूलही तयार करण्यात आले आहे. हे मोड्यूल सशस्त्र वाहनावर ठेवता येऊ शकते. हे उपकरण गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असले तरी त्याची नवी आवृत्ती लवकरच उपलब्ध करण्यात येणार आहे. कंपनीने २०१२ मध्ये एक किलोमीटर दूर राहून पोलादी खांब वितळविता येतो, असा दावा केला होता. त्यानंतर बाल्टिक समुद्रात तसेच आल्प्स पर्वतरांगांमध्ये ड्रोन पाडण्यात हे शस्त्र सक्षम ठरले होते.

आजमितीस विशेषतः छोट्या ड्रोनवर कारवाई करण्यासाठी लेसर शस्त्र उपयुक्त आहे, असे ग्राङ्ग सांगतात. हे शस्त्र कसे काम करते, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. लेसर बीम ङ्गोटॉन्सपासून म्हणजेच प्रकाशाच्या किरणांपासून तयार होतो आणि आत्यंतिक वेगाने एखाद्या वस्तूला धडकतो. एकाच बिंदूवर लेसर किरण केंद्रित होणे अत्यंत आवश्यक असते. असे झाल्यास त्या बिंदूचे तापमान चटकन वाढते. दोन किलोमीटर अंतरावरील लक्ष्य लेसर किरणांच्या साह्याने कसे भेदता येईल, यावर रेनमेटाल कंपनी अनेक वर्षांपासून परीक्षणे करीत आहे. लेसर शस्त्रांबाबत शास्त्रज्ञ मात्र अजूनही साशंकच आहेत. जर्मन इन्स्टिट्यूट ङ्गॉर इंटरनॅशनल अँड सिक्युरिटी अङ्गेअर्स या संस्थेतील शस्त्रास्त्र तज्ज्ञ मार्सेल डिकोव्ह यांचे म्हणणे असे की, अमेरिकेसारखा देशही अनेक दशकांपासून लेसर शस्त्रे विकसित करण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु या प्रयत्नांमध्ये काही प्रगती झाली असावी, असे वाटत नाही.

वस्तू तसेच वातावरणाच्या आधारावर लेसर किरणांच्या प्रभावाबद्दल भविष्यवाणी करणे खूपच अवघड आहे. डिकोव्ह यांच्या म्हणण्यानुसार, शस्त्रास्त्र बनविणार्‍या कंपन्यांच्या चकचकीत माहितीपत्रकातून आपल्याला जे दिसते, तितके प्रभावी लेसर शस्त्र तयार होणे नजीकच्या भविष्यात तरी शक्य दिसत नाही. त्याचप्रमाणे लेसर किरणांची निर्मिती आणि प्रक्षेपण यासाठी लागणारे साहित्य एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी वाहून नेणे अतिशय खर्चिक आहे. एवढे करूनसुद्धा लेसर शस्त्राचा वापर करण्याचे ठरविलेच तरी त्याचा प्रभाव बर्‍याच अंशी वातावरणावर अवलंबून असतो. एखादा इन्ङ्ग्रारेड लेसर किरण पावसाळ्यात किंवा धुके असताना वापरता येऊ शकत नाही. त्याचा वापर वेव्हलेन्थवर अवलंबून असतो.

एम. बी. डी. ए. कंपनीच्या लेसर विभाग प्रमुख डोरिस लारमान या विषयाकडे काहीशा वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतात. त्यांच्या मते, गेल्या दहा वर्षांच्या काळात आम्ही अनेक अनुभवांमधून गेलो आहोत आणि त्यातूनच आम्ही अचूक निष्कर्षाकडे जात आहोत. पर्याप्त ऊर्जेची निर्मिती करणे हा ङ्गार मोठा प्रश्‍न नाही. विशेषतः नौदलाच्या युद्धनौकांचे इंजिन त्यासाठी पुरेसे मोठे असते. लेसरच्या वापरामुळे होणार्‍या अतिरिक्त नुकसानीचे काय करायचे, असाही एक प्रश्‍न तज्ज्ञांना पडतो. उदाहरणार्थ, जर लेसर बीमचा ङ्गोकस ठीक करताना तो जवळून जाणार्‍या एखाद्या विमानावर पडला, तर त्याचा परिणाम भीषण असू शकतो. लेसर किरणामुळे लोकांना अंधत्वही येऊ शकते. परंतु एम. डी. बी. ए. च्या लारमन आणि रेनमेटालचे ग्राङ्ग अशा कोणत्याही प्रकारच्या घटनेची शक्यता नसल्याचे सांगतात. त्यांच्या म्हणण्यानुसार, योग्य लक्ष्यापासून लेसर किरण अन्यत्र भरकटला तर तो आपोआप बंद होतो.

असे असले तरी जर्मन युद्धनौकेवर ज्या लेसर शस्त्राचे प्रात्यक्षिक होणार आहे, त्याबाबत जर्मनी खूपच उत्साहित आणि सकारात्मक आहे. ङ्ग्रिगेट कॅप्टन क्लॉस बोहनेनस्टेंगेल यांचे म्हणणे असे की, उच्च ऊर्जा असणार्‍या लेसर किरणांचे अनेक ङ्गायदे आहेत. ते अत्यंत अचूक मारा करणारे असतात आणि त्यांचा प्रभाव कमी अथवा अधिक करता येणे शक्य आहे. उदाहरणार्थ, शत्रूच्या स्पीडबोटचे इंजिन लेसर शस्त्राच्या साह्याने बंद करणे शक्य आहे. थोडक्यात, लेसर शस्त्राचे पहिले पाऊल समुद्रात पडणार आहे. पुढे काय होईल, हे आताच सांगता येणार नाही. बोहनेनस्टेंगेल यांना मात्र पुढील दहा वर्षांच्या काळात पहिले उच्च ऊर्जा लेसर शस्त्र वापरात येईल, याबद्दल खात्री आहे.