ब्रेकिंग न्यूज़
लक्ष्मीकांत पार्सेकरांशी बोलणी करणार नाही ः तेंडुलकर

लक्ष्मीकांत पार्सेकरांशी बोलणी करणार नाही ः तेंडुलकर

पणजी (न. प्र.)
ज्येष्ठ भाजप नेते तथा माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी आपणाला तसेच मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना उद्देशून अपशब्द वापरले आहेत. त्यामुळे बंडखोर नेत्याशी बोलणी करण्याचा आमचा मुळीच विचार नाही, असे प्रदेश भाजप अध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी काल अनौपचारिकपणे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
पार्सेकर यांनी व्यक्तीशः मला माझ्या आईवरून शिव्या, तसेच मनोहर पर्रीकर व राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना उद्देशून अपशब्द काढल्याचे तेंडुलकर यांनी यावेळी सांगितले.
नेतृत्वबदलावर निर्णय
पक्षश्रेष्ठीच घेतील
दरम्यान, नवा नेता कोण असावा याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाध्यक्ष अमित शहा हेच घेणार असल्याचे प्रदेश भाजप अध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी काल पत्रकारांशी अनौपचारीक बोलताना सांगितले.
सध्या पक्षाचा, सगळा भर आहे तो आगामी लोकसभा निवडणुकीवर, असे सांगून लोकसभेच्या दोन्ही जागा आम्ही जिंकणार आहोत, असा विश्वास त्यांनी यावेळी बोलता व्यक्त केला.
त्याचबरोबर गोव्यात लवकरच होणार्‍या विधानसभा पोटनिवडणुकीतही भाजपचाच विजय होणार असल्याचे तेंडुलकर म्हणाले.