लंकेचा इंग्लंडला शॉक

लसिथ मलिंगाचा भेदक मारा आणि त्याला धनंजय डीसिल्वाच्या फिरकीने दिलेल्या साथीच्या जोरावर श्रीलंकेने विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेत काल शुक्रवारी यजमान इंग्लंडवर २० धावांनी सनसनाटी विजय संपादन केला. श्रीलंकेने विजयासाठी ठेवलेल्या २३३ धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ ४७ षटकांत २१२ धावांत आटोपला. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने अंतिम क्षणांत फटकेबाजी करून संघाच्या विजयासाठी प्रयत्न केले. परंतु, दुसर्‍या टोकाने त्याला साथ मिळाली नाही.

कर्णधार करुणारत्नेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर माजी कर्णधार अँजेलो मॅथ्यूज याच्या ३८व्या अर्धशतकाच्या बळावर लंकेने दोनशेपार मजल मारली. लाहिरु थिरिमानेच्या जागी संघात स्थान मिळालेल्या अविष्का फर्नांडोने ४९ धावा करत मौल्यवान योगदान दिले. माफक लक्ष्याचा पाठलाग करताना मलिंगाने बॅअरस्टोवला शून्यावर माघारी धाडले. माजी कर्णधार ज्यो रुटने आपले ३३वे अर्धशतक करत कर्णधार ऑईन मॉर्गनसह तिसर्‍या गड्यासाठी ४७ धावांची भागीदारी केली. यानंतर त्याने बेन स्टोक्ससह ५४ धावा जोडत संघाला सुस्थितीत आणले. परंतु, ३ बाद १२७ या स्थितीतून इंग्लंडची ९ बाद १८६ अशी घसरगुंडी उडाली.

धावफलक
श्रीलंका ः दिमुथ करुणारत्ने झे. बटलर गो. आर्चर १, कुशल परेरा झे. अली गो. वोक्स २, अविष्का फर्नांडो झे. रशीद गो. वूड ४९, कुशल मेंडीस झे. मॉर्गन गो. रशीद ४६, अँजेलो मॅथ्यूज नाबाद ८५ (११५ चेंडू, ५ चौकार, १ षटकार), जीवन मेंडीस झे. व गो. रशीद ०, धनंजय डीसिल्वा झे. रुट गो. आर्चर २९, थिसारा परेरा झे. रशीद गो. आर्चर २, इसुरू उदाना झे. रुट गो. वूड ६, लसिथ मलिंगा त्रि. गो. वूड १, नुवान प्रदीप नाबाद १, अवांतर १०, एकूण ५० षटकांत ९ बाद २३२
गोलंदाजी ः ख्रिस वोक्स ५-०-२२-१, जोफ्रा आर्चर १०-२-५२-३, मार्क वूड ८-०-४०-३, बेन स्टोक्स ५-०-१६-१, मोईन अली १०-०-४०-०, आदिल रशीद १०-०-४५-२, ज्यो रुट २-०-१३-०

इंग्लंड ः जेम्स व्हिन्स झे. कुशल मेंडीस गो. मलिंगा १४, जॉनी बॅअरस्टोव पायचीत गो. मलिंगा ०, ज्यो रुट झे. कुशल परेरा गो. मलिंगा ५७, ऑईन मॉर्गन झे. व गो. उदाना २१, बेन स्टोक्स नाबाद ८२, जोस बटलर पायचीत गो. मलिंगा १०, मोईन अली झे. उदाना गो. धनंजय १६, ख्रिस वोक्स झे. कुशल परेरा गो. धनंजय २, आदिल रशीद झे. कुशल परेरा गो. धनंजय १, जोफ्रा आर्चर झे. थिसारा गो. उदाना ३, मार्क वूड झे. कुशल परेरा गो. प्रदीप ०, अवांतर ६, एकूण ४७ षटकांत सर्वबाद २१२
गोलंदाजी ः लसिथ मलिंगा १०-१-४३-४, नुवान प्रदीप १०-१-३८-१, धनंजय डीसिल्वा ८-०-३२-३, थिसारा परेरा ८-०-३४-०, इसुरु उदाना ८-०-४१-२, जीवन मेंडीस ३-०-२३-०र