ब्रेकिंग न्यूज़

रोजगार प्रश्‍नी मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी ः कॉंग्रेस

राज्यातील युवा वर्गाला रोजगार प्राप्त करून देणे याला आमचे प्राधान्य नाही, असे निवेदन करणारे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यातील युवा वर्गाची माफी मागावी, अशी मागणी काल प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केली. तसेच असे निवेदन केल्याबद्दल आम्ही मुख्यमंत्र्यांचा निषेध करीत आहोत, असे चोडणकर म्हणाले.

कारवार येथे प्रचारासाठी गेले असता प्रमोद सावंत यांनी तेथील युवकांना गोव्यात रोजगार प्राप्त करून देण्याची घोषणा केली होती. आणि पणजीत सिद्धार्थ कुंकळयेकर यांचा उमेदवारी अर्ज भरून झाल्यावर पत्रकारांशी बोलताना राज्यातील युवकांना नोकर्‍या देण्यास सरकारचे प्राधान्य नसल्याचे सांगून त्यांनी गोव्यातील युवा वर्गाची थट्टा केली असल्याचे चोडणकर म्हणाले. कॉंग्रेस पक्षाने आपल्या जाहीरनाम्यातून नोकर्‍यांची निर्मिती कशी केली जाईल हे स्पष्ट केले असल्याचे चोडणकर यावेळी म्हणाले.