रेणुका डिसिल्वा यांचा एसजीपीडीएचा राजिनामा

दक्षिण गोवा नियोजन व विकास प्राधिकरण तथा एसजीपीडीए अध्यक्षपदाचा आपण राजिनामा देत असल्याची माहिती डॉ. रेणुका डिसिल्वा यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. यावेळी आमदार विजय सरदेसाई उपस्थित होते.

यावेळी डिसिल्वा यांनी आपण केलेल्या विविध कामांची माहिती दिली. एसजीपीडीएने विकासविषयक घेतलेल्या निर्णयांना फातोर्डा व मडगावमधील लोकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल विजय सरदेसाई यांनी आभार मानले. ताळसांझर, कबरस्थान, हॉलिस्पिरिट सीमेटरीजवळ पार्किंग विभाग, करमणुकीचे पार्क मोंत चॅपलच्या सभोवती हरित विभाग, दामबाबाच्या तळीचे सौंदर्यीकरण, हॉस्पिसियू हॉस्पिटल वारसा वास्तु असा कामांना मान्यता दिली असे सरदेसाई यांनी यावेळी सांगितले.

आता सरकारला विरोध योग्य नाही ः सरदेसाई
मडगाव एसपीडीएच्या कामात माजी मुख्यमंत्र्यांनी कधीच हस्तक्षेप केला नाही. त्यांना विकास हवा होता. या दोन वर्षात ज्या विकास कामांना चालना दिली ती सरकारने पूर्ण केली पाहिजेत व त्यांनी ती न केल्यास त्याविरुद्ध आम्हाला भांडावे लागेल असे विजय सरदेसाईंनी सांगितले. आपण दोन वर्षे सरकारात होतो. आता सरकारला विरोध करणे योग्य ठरणार नाही. वेळ आल्यानंतरच त्यावर विचार केला जाईल.