रुग्ण वाढतील म्हणून चाचण्या थांबवल्या

>> विजय सरदेसाई यांचा मुख्यमंत्र्यांवर आरोप

राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा कमी दाखवता यावा, यासाठीच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कोरोनासाठी जास्त लोकांची चाचणी न करण्याचे धोरण अवलंबिले असल्याचा आरोप काल गोवा फॉरवर्ड पार्टीचे प्रमुख व फातोर्डा मतदारसंघाचे आमदार विजय सरदेसाई यांनी केला.

जर मोठ्या प्रमाणात कोरोनासाठी लोकांच्या चाचण्या घेतल्या तर मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडतील. चाचण्याच कमी केल्या, की रुग्णही कमीच सापडतील, असे ते म्हणाले.