राष्ट्रीय निवड समितीचे रालिन डिसोझा सदस्य

गोवा बास्केटबॉल असोसिएशनचे सचिव फा. रालिन डिसोझा यांची भारतीय फुटबॉल महासंघाने युवा मुलींच्या निवड समितीमध्ये सदस्य म्हणून नेमणूक केली आहे. यासाठी एकाद्या गोमंतकीयाची निवड होण्याची ही पहिलीच वेळ आहे. दक्षिण आशियाई बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धा तसेच आशियाई आंतरराष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेपूर्वीच्या राष्ट्रीय शिबिरासाठी खेळाडू निवडणार्‍या समितीचे ते भाग असतील. कोईंबतूर येथे २१ मे रोजी संपलेल्या २६व्या युवा राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत त्यांचा सक्रीय सहभाग होता. निवड समितीचे अध्यक्षपद सूमन शर्मा भूषविणार असून या समितीत लीलम्मा संतोष थॉमस, विद्या आर., सविता एलएस व आशा हेगडे हे इतर सदस्य असतील.