राय-मडगावात बस अपघात

राय-मडगावात बस अपघात

>> दोन गंभीर जखमी

काल सोमवारी दुपारी मडगावहून फोंडा येथे निघालेल्या खासगी प्रवासी बसला राय येथे अपघात झाला. चालकाच्या स्टेअरिंगवरील ताबा गेल्याने बस राय येथे रस्त्यालगत असलेल्या शेतात पालथी होऊन पडली. या अपघातात बसमधील १५ प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या. त्यातील महेश भजंती (२०) व शिवाजी मेलकेर (२१) ह्यांना जास्त मार बसला. ही घटना काल सोमवारी दुपारी २.१५ वाजता झाली. जीए०२ व्ही ४०४७ क्रमांकाची ही बस मडगावहून फोंडा येथेै निघाली होता.

मडगाव येथून ही बस दुपारी १.३० वाजता सुटली होती. आत बावीस प्रवासी होते. ही बस वेगात जात असता चालकाचा ताबा गेला व ती शेतात पालथी होऊन पडली. बस शेतात पडताच आतील प्रवाशांनी आरडाओरड करायला सुरूवात केली. स्थानिक लोकांनी व पोलिसांनी खिडक्या फोडून बसमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. सुदैवाने बसमधील प्रवाशांचे किरकोळ जखमांवर निभावले. मायणा – कुडतरी पोलिसांनी या प्रकरणी तपास केला असून बस चालकावर गुन्हा दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.