राज्यात ४२ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण

राज्यात नवीन ४२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण काल आढळून आले असून कोरोना पॉझिटिव्ह सध्याच्या रुग्णांची संख्या ६६० झाली आहे. राज्यातील ८४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बरे झाले आहेत. साळ – डिचोली, कुंडई, केपे येथे प्रत्येकी १ आयसोलेटेड रुग्ण आढळून आले आहेत. साखळी, मोर्ले – सत्तरी येथे नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या ९५१ झाली आहे. राज्यात आत्तापर्यंत २८९ रुग्ण बरे झाले असून दोघा रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

साळ डिचोली येथे १ कोरोना पॉझिटिव्ह आयसोलेटेड रुग्ण आढळून आला. कुंडई येथे आयसोलेटेड कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. तसेच केपे येथेही रुग्ण आढळला आहे. म्हापसा, खोर्ली येथेही एक नाभिक कोरोना पॉझिटिव्ह सापडला आहे.
मोर्ले येथे आणखी ३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. मोर्लेतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २१ झाली आहे. साखळीत आयसोलेटेड पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४ झाली आहे. माजी आरोग्य मंत्र्याच्या कुटुंबातील दोन व्यक्ती आणि संपर्कातील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. आंबावली येथे नवीन ६ कोरोना रुग्ण आढळून आले.

जीएमसीच्या खास कोरोना वॉर्डात कोरोना संशयित १६ रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. आरोग्य खात्याकडून २१४४ नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहेत. प्रयोगशाळेतून १७०३ नमुन्याची तपासणी करून अहवाल जाहीर केले आहेत. १११३ नमुने तपासणीच्या प्रतीक्षेत आहेत. कुडतरीत आतापर्यंत २८ रुग्ण आढळून आले आहेत.

वास्को नगराध्यक्ष, नगरसेविकेला कोरोना
वास्को येथील नगरपालिकेचे नगराध्यक्ष, एका नगरसेविकेला कोरोनाची बाधा झाली आहे. बायणा येथे आणखी २ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून या भागातील रुग्णांची संख्या ३९ झाली आहे. तर, सडा येथे आणखी १ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे.र