राज्यात १ ऑगस्टनंतर जोरदार पावसाची शक्यता

राज्यात पावसाचे प्रमाण येत्या १ ऑगस्टनंतर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. राज्यात मागील दहा दिवसांपासून पावसाचे प्रमाण कमी आहे. पावसाचे कमी प्रमाण जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत कायम राहणार आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्यात मागील चोवीस तासात अर्धा इंच पावसाची नोंद झाली आहे. राज्यात आत्तापर्यंत ८७.४४ इंच पावसाची नोंद झाली असून पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा १७ टक्के जास्त आहे.