राज्यात रस्ता अपघातांत ५ महिन्यांत १३२ बळी

राज्यात जानेवारी २०१९ ते मे २०१९ या पाच महिन्याच्या काळात रस्ता अपघातात १३२ जणांचा बळी गेला आहे. गत २०१८ च्या तुलनेत रस्ता अपघातातील बळींच्या संख्येत वाढ झाली आहे. गत वर्षी याच काळात रस्ता अपघातात ११८ जणांचा बळी गेला होता. बेशिस्त व वेगाने वाहन चालविण्यामुळे रस्ता अपघातातील बळीची संख्या वाढल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.
या पाच महिन्यात बळी पडलेल्या मध्ये ७७ दुचाकी चालक आणि दुचाकीच्या मागे बसलेल्या १५ जणांचा समावेश आहे.