ब्रेकिंग न्यूज़

राज्यात पेट्रोलपेक्षा डिझेल महाग

पणजी (प्रतिनिधी) : राज्यात डिझेलच्या दराने पेट्रोलच्या दराला मागे टाकले आहे. गुरुवारी डिझेलचा दर प्रति लीटर ७३ रुपये ५२ पैसा एवढा झाला असून पेट्रोलचा दर ७३ रुपये ४२ पैसे एवढा झाला आहे. राज्यात पेट्रोलच्या दरापेक्षा डिझेलचा दर कमी होता. मागील काही दिवसांपासून पेट्रोल व डिझेलचे दर जवळ येऊन ठेपले होते. गुरूवारी राज्यातील डिझेलच्या दरात २४ पैशांनी वाढ झाली. पेट्रोलच्या दरात केवळ ६ पैसे वाढ झाल्याने डिझेलचा दर पेट्रोलच्या दरापेक्षा जास्त झाला आहे.