राज्यातील ४६ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

पोलीस खात्यातील ४६ पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचा आदेश काल जारी करण्यात आला आहे. पोलीस मुख्यालयातील पोलीस अधीक्षक एस. एम, प्रभुदेसाई यांनी पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचा आदेश जारी केला आहे.

पोलीस निरीक्षक तुकाराम चव्हाण यांची काणकोण पोलीस स्टेशन, गुरूदास कदम यांची मायणा कुडतरी पोलीस स्टेशन, उदय गावडे यांची एसबी पणजी, नवलेश देसाई यांची तळपण किनारी पोलीस स्टेशन, शिवराम वायंगणकर यांची वाळपई पोलीस स्टेशन, फिलोमेनो कॉस्ता यांची गुन्हा शाखा रायबंदर, सुदेश नार्वेकर यांची वाहतूक विभाग वास्को, राहुल परब यांची गुन्हा विभाग (एसआयटी), राजेश कुमार यांची शिवोली किनारी पोलीस स्टेशन, राजन निगळ्ये यांची वास्को रेल्वे पोलीस स्टेशन येथे बदली करण्यात आली आहे.

पोलीस निरीक्षक सिद्धांत शिरोडकर यांची हार्बर किनारी पोलीस स्टेशन, विल्सन डिसोझा यांची पणजी किनारी सुरक्षा पोलीस स्टेशन, सोमनाथ माजिक यांची जीआरपीसी, रवींद्र देसाई यांची कुडचडे पोलीस स्टेशन, शेख सलीम यांची वाहतूक विभाग कळंगुट, उदय परब यांची आगशी पोलीस स्टेशन, नेल्सन आल्बुकर्क यांची पोलीस मुख्यालय पणजी, शैलेश नार्वेकर यांची वाहतूक विभाग दाबोळी विमानतळ पोलीस स्टेशन, प्रवीणकुमार वस्त यांची आर्थिक गुन्हा विभाग, पणजी, रामनाथ ऊर्फ कपील नायक यांची फातोर्डा पोलीस स्टेशनवर नियुक्ती करण्यात आली आहे.

पोलीस निरीक्षक जिवबा दळवी यांची गुन्हा विभाग रायबंदर, तुषार लोटलीकर यांची म्हापसा, मिलिंद एम. बी. यांची, हरिश्‍चंद्र मडकईकर यांची वेर्णा, शेरीफ जाकीस यांची कोकण रेल्वे पोलीस स्टेशन, सूरज हळदणकर यांची एसीबी दक्षता, विश्‍वेश कर्पे यांची गुन्हा अन्वेषण शाखा (एसआयटी), रॉय परेरा यांची एसपीसीआर, पणजी येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

पोलीस निरीक्षक संतोष देसाई यांची केपे पोलीस स्टेशन, सचिन नार्वेकर यांची मडगाव शहर, संजय दळवी यांची डिचोली, सूरज गांवस यांची हणजुण, विजय राणे सरदेसाई यांची वाहतूक विभाग डिचोली, टेरेन डिकॉस्टा यांची कुंकळ्ळी, निनाद देऊलकर यांची पर्वरी, ब्युटानो पाझिटो यांची एटीएस, पणजी, कृष्णा सिनारी यांची ओल्ड गोवा पोलीस स्टेशन येथे बदली करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक दीपक पेडणेकर यांची एसीबी दक्षता, नारायण चिमुलकर यांची गुन्हा विभाग, रायबंदर, मेल्सन कुलासो यांची कोलवा, मोहन गावडे यांची फोंडा, अर्जुन सांगोडकर यांची वाहतूक विभाग कुडचडे, सूरज सामंत यांची वाहतूक विभाग मडगाव, सागर एकोस्कर यांची दाबोळी विमानतळ पोलीस स्टेशन, सचिन पन्हाळकर यांची सांगे, संदेश चोडणकर यांची पेडणे पोलीस स्टेशन येथे बदली करण्यात आली आहे.